Elon Musk ने केली X ची साफसफाई; कोट्यवधी आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या, तर लाखो खाती बंद!

138
Elon Musk ने केली X ची साफसफाई; कोट्यवधी आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या, तर लाखो खाती बंद!
Elon Musk ने केली X ची साफसफाई; कोट्यवधी आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या, तर लाखो खाती बंद!

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्याचे नामकरण ‘X’ असे केले होते. नामांतर झाल्यानंतर सादर करण्यात आलेला हा पहिला पारदर्शकता अहवाल आहे. या अहवालात कंपनीने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा तपशील दिला आहे. जानेवारी ते जून 2024 दरम्यान, X ने लाखो खाती बंद केली आहेत तर कोट्यवधी आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या आहेत. या अहवालानुसार, X ने जानेवारी ते जून 2024 या सहा महिन्यांत जवळपास 52.9 लाख खाती बंद केली आहेत तर सुमारे 1.06 कोटी पोस्ट, संवेदनशील म्हणून जाहीर केल्यात किंवा डिलीट केल्या आहेत. (Elon Musk)

पोस्टमध्ये 29% वाढ

यापूर्वी X ने पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध करण्याऐवजी एक ब्लॉग पोस्ट प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये म्हटले होते की, 2022 सालच्या पहिल्या सहामाहीत X च्या धोरणांचा भंग करणाऱ्या 6.5 दशलक्ष पोस्ट आढळल्या होत्या. 2021 च्या तुलनेत 2022मध्ये अशा पोस्टमध्ये 29% वाढ झाली होती. 2022 साली 16 लाख खाती बंद करण्यात आली होती. (Elon Musk)

छळवणुकीचे प्रकार दिसून आलेली 11 लाखांपेक्षा अधिक खाती बंद

X ने पारदर्शकता अहवालात म्हटले आहे की असभ्य वर्तन, छळवणुकीचे प्रकार दिसून आलेली 11 लाखांपेक्षा अधिक खाती बंद करण्यात आलीतर अशा प्रकारच्या 26.48 लाख पोस्ट डिलीट करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. बेकायदेशीर वस्तू आणि सेवांशी निगडीत तक्रारींनंतर 5.14 लाख खाती बंद करण्यात आली तर 5.49 लाख पोस्ट डिलीट करण्यात आल्या. (Elon Musk)

बालसुरक्षा, अश्लीलता, विखारी विधाने, हिंसक मजकूर, दिशाभूल करणाऱ्या बाबी X वर प्रतिबंधित आहेत. असे असतानाही अशा स्वरुपाच्या पोस्ट करणाऱ्या खात्यांवर कारवाई करण्यात आली. अशी लाखो अकाऊंट बंद करण्यात आली असून या पोस्टही हटविण्यात आल्या आहेत. X वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर कंपनीने आपल्या नियमांची पुन्हा तपासणी केली आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. X चा वापर करून खोट्या, दिशाभूल करणाऱ्या, बेकायदेशीर, आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबतची माहिती देणाऱ्या सगळ्यात जास्त पोस्ट युरोपियन महासंघातून आल्या आहेत. ज्यातील 56 टक्के प्रकरणांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. (Elon Musk)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.