Elon Musk : एलॉन मस्क यांच्या ५६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पे पॅकेजला गुंतवणुकदारांची मंजुरी

Elon Musk : कंपनीने समभागधारकांकडून त्यासाठी सार्वमत मागवलं होतं.

125
Elon Musk : एलॉन मस्क यांच्या ५६ अब्ज अमेरिकन डॉलरच्या पे पॅकेजला गुंतवणुकदारांची मंजुरी
  • ऋजुता लुकतुके

टेस्ला कंपनीच्या (Tesla Company) गुंतवणूकदारांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एलॉन मस्क यांना वर्षाला ५६ अब्ज अमेरिकन डॉलर इतका महेनताना देण्याला परवानगी दिली आहे. कंपनीकडून शिवाय कंपनीचं मुख्यालय डेलावेअरमधून टेक्सासला हलवायलाही मंजुरी दिली आहे. टेस्ला समुहीच्या ६ कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांकडून कंपनीने सार्वमत घेतलं होतं. नेमकी किती मतं मस्क किंवा या ठरावाच्या बाजूने पडली हे उघड केलं नसलं, तरी मस्क यांना अजूनही गुंतवणूकदारांचा पाठिंबा असल्याचं या सार्वमतातून समोर आलं आहे. (Elon Musk)

मस्क (Elon Musk) यांनी एक दिवस आधीच ठरावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं होतं. मस्क यांचं नवीन पे पॅकेज गुंतवणूकदारांनी मान्य केलं असलं तरी त्याला डेलावेअर राज्याच्या न्यायाधीशांचीही मंजुरी लागेल आणि ती मिळाली नाही तर कंपनीला टेक्सासला कारभार हलवल्यावर पुन्हा एकदा नवीन राज्यात ही परवानगी मागावी लागेल. (Elon Musk)

(हेही वाचा – FDI 2024 : थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ सर्वाधिक असणारी भारतीय राज्ये)

२०१८ मध्येही असंच सार्वमत घेण्यात आलं होतं. त्यावेळी मस्क (Elon Musk) यांना वार्षिक ५५.८ अब्ज अमेरिकन डॉलर मेहनताना देण्यास ७३ टक्के गुंतवणूकदारांनी मान्यता दिली होती. ही रक्कम मस्क यांना टेस्लाच्या शेअरच्या रुपात मिळणार होते. त्या शेअरचं मूल्य आता ४८.४ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं घटलं आहे. कोरोना नंतरच्या काळात एलॉन मस्क यांच्यावरही गुंतवणूकदार आणि संचालक मंडळाचा विश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. कंपनीचे काही निर्णय एकतर्फी घेण्याचा आरोप त्यांच्यावर झाला. आणि मंडळातील इतर लोकांचा त्याला विरोध होत आहे. (Elon Musk)

गेल्यावर्षी मस्क यांनी कंपनीतील सगळ्यात मोठी नोकर कपात जाहीर केली आणि अगदी मोठ्या पदावरील लोकांनाही यात काढून टाकलं. पण, एका आठवड्यात यातल्या कित्येक लोकांना परतही घेतलं होतं. मस्क यांच्या काहीशा विक्षिप्त वागण्याच्या बातम्याही अमेरिकन माध्यमांमध्ये पसरत आहेत. पण, या पार्श्वभूमीवर मस्क यांना गुंतवणूकदारांनी मात्र पाठिंबा दिलेला दिसत आहे. (Elon Musk)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.