Elon Musk : एलॉन मस्कची एकूण संपत्ती ३५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या पार, कशामुळे झाली एवढी वाढ?

Elon Musk : ३५० अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठणारे मस्क जगातील पहिले व्यक्ती आहेत.

89
Elon Musk Net Worth : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे नेमका किती पैसा आहे?
Elon Musk Net Worth : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे नेमका किती पैसा आहे?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून मोठी वाढ झाली आहे. मागच्या एका महिन्यात टेस्लाचे शेअर वाढल्यामुळे मस्क यांच्या संपत्तीतही १० अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे. आणि त्यामुळे ब्लूमबर्ग ताज्या अहवालानुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती ३५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर गेली आहे. हा टप्पा पार करणारे ते पहिले उद्योजक ठरले आहेत.

विशेष म्हणजे चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत १२४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. तेव्हापासून, त्याच्या एकूण संपत्तीत ८९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये ४ नोव्हेंबरपासून ४७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एलॉन मस्क हे ट्रंप यांचे पाठीराखे मानले जातात.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटता सुटेना, पाकच्या अटी भारताला अमान्य)

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, त्यांची एकूण संपत्ती आता 353 अब्ज डॉलर झाली आहे. आजपर्यंत एकही अब्जाधीश हे करु शकला नाही. ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये ३०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारेही मस्क (Elon Musk) एकमेव आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा हे साध्य केलं होतं. जाणकारांचा असा अंदाज आहे की जर टेस्लाच्या शेअरमधील वाढ अशीच सुरू राहिली तर या वर्षाच्या शेवटी मस्क (Elon Musk) यांची संपत्तीही ४०० अब्ज अमेरिकन डॉलरवर जाऊ शकते.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, सोमवारी एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये १०.३ अब्ज डॉलर किंवा ४.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात त्यांच्या एकूण संपत्तीत १२४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ५४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यापासून म्हणजेच ५ नोव्हेंबरपासून एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या एकूण संपत्तीत ८९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मस्क यांची संपत्ती वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टेस्ला कंपनीची अमेरिकन शेअर बाजारात होत असलेली खरेदी हेच आहे. सोमवारी एका दिवसांत टेस्लाच्या शेअर्समध्ये ३.४६ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ३६० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.