ट्विटरची विक्री, कोणी लावली बोली?

124

सध्या सोशल मीडियामध्ये अग्रस्थानी असलेल्या ट्विटरला खरेदी करण्यासाठी त्यांची बोली लागली आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरला ४१ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे. एलॉन मस्कने प्रति शेअर ५४.२० डॉलर्स या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आहे.गुरुवारी एका नियामक फाइलिंगमध्ये मस्कच्या ऑफरचा खुलासा करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी ट्विटरच्या बोर्डात सहभागी होण्याची ऑफर नाकारली होती. एलॉन मस्कच्या या ऑफरनंतर ट्विटरच्या स्टॉकमध्ये १२ टक्के वाढ होत आहे.

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवालांनी दिली माहिती 

एलॉन मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, माझी गुंतवणूक केल्यापासून, मला आता हे समजले आहे की, कंपनी सध्याच्या स्वरूपात ही सामाजिक गरज पूर्ण करणार नाही. ट्विटरला खासगी कंपनी बनवण्याची गरज आहे. माझी ऑफर ही सर्वोत्कृष्ट आणि अंतिम ऑफर आहे आणि ती स्वीकारली गेली नाही, तर मला शेअरहोल्डर म्हणून माझ्या स्थितीचा पुनर्विचार करावा लागेल, असेही मस्क म्हणाले. यापूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पराग अग्रवाल यांनी ट्विट करून लिहिले की, एलॉन मस्कच्या बोर्डात सामील होण्याबाबत मी त्यांच्याशी अनेकदा चर्चा केली.

(हेही वाचा सदावर्ते करणार पोलिस व्हॅनमधून महाराष्ट्र भ्रमण? ठिकठिकाणी तक्रारी दाखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.