टेस्लाने भारतात त्यांचा पहिला कार कारखाना सुरू करण्यासाठी भारताच्या वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे. भारत सरकारला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात वार्षिक ५,००,००० इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची क्षमता असलेला कारखाना उभारण्याची चर्चा आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती २५ लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. टेस्ला भारताकडे निर्यात केंद्र म्हणूनही पाहत आहे. वाहने भारतात तयार करणे आणि नंतर इंडो-पॅसिफिक प्रदेशातील इतर देशांना निर्यात करण्याचा विचार टेस्ला करत आहे.
टेस्ला एक महत्त्वाकांक्षी योजना घेऊन आली आहे, आणि आम्हाला खात्री आहे की यावेळी हालचाल सकारात्मक होईल, विशेषत: त्यात स्थानिक उत्पादन आणि निर्यात या दोन्हींचा समावेश आहे,” असे सुत्राने सांगितले. इतर अनेक कंपन्यांच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदीच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाचा एक भाग म्हणून भारतात कारखाने सुरू केले आहेत जेथे अनेक कंपन्यांना संधी दिली आहे.
गेल्या महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्जाधीश आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना पंतप्रधान मोदींच्या यूएस राज्य दौऱ्यादरम्यान भेटले तेव्हा त्यांना भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर, इलॉन मस्क म्हणाले की, “मोदी यांना खरोखर भारताची काळजी आहे कारण ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत, जे आम्ही करू इच्छितो. आम्ही फक्त योग्य वेळ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत मला विश्वास आहे की टेस्ला भारतात असेल आणि ते शक्य तितक्या लवकर प्रगती करेल.”
(हेही वाचा Seema Haidar : सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवा अन्यथा…; मुंबई पोलिसांना धमकी)
Join Our WhatsApp Community