- ऋजुता लुकतुके
एलॉन मस्क यांनी ट्विटर (Elon Musk XMail) ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडिया हे व्यवसाय क्षेत्रही मनावर घेतलेलं दिसतंय. आता त्यांनी एक्समेल नावाने नवीन ईमेल यंत्रणा सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे. अलीकडेच गुगल कंपनी आपलं प्रसिद्ध जीमेल हे संदेश दळणवळण इंजिन बंद करत असल्याची अफवा इंटरनेटवर पसरली होती. त्यानंतर जीमेलला टक्कर देण्यासाठी एक्समेल बाजारात येत असल्याचीही चर्चा सुरू झाली. आणि ही चर्चा खरी असल्याचं दस्तुरखुद्द एलॉन मस्क यांनी आता स्पष्ट केलं आहे.
एक्स (आधीचं ट्विटर) कंपनीतील सुरक्षा अभियांत्रिकी चमूतील नॅथन मॅकगेडी यांनी एक ट्विट करून एक्समेल नेमकं कधी येणार आहे, अशी विचारणा केली होती. आणि याला मस्क यांनी तातडीने उत्तर दिलं आणि एक्समेलचा मूहूर्त लवकरच लागणार असल्याचं ते म्हणाले. (Elon Musk XMail)
It’s coming
— Elon Musk (@elonmusk) February 23, 2024
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येत भाविकांना दर्शन घेणे आणखी सुलभ होण्यासाठी योगी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय, वाचा सविस्तर…)
गेल्या आठवड्यात गुगल कंपनी ऑगस्ट २०२४ पासून जीमेल बंद करणार असल्याची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली होती. जीमेल संदेश पाठवणं, स्वीकारणं आणि तो जीमेलवर साठवणं या सगळ्या क्रिया बंद करणार असल्याचं बोललं जात होतं. यावर गुगलने तातडीने ट्विट करून या बातमीत तथ्य नसल्याचं सांगितलं. ‘आम्ही कुठेही जात नाही आहोत. आम्ही इथेच आहोत,’ असं गुगलने निक्षून सांगितलं होतं. (Elon Musk XMail)
Gmail is here to stay.
— Gmail (@gmail) February 22, 2024
तरीही अफवा पसरतच राहिली. आणि त्यातच आता एक्समेलची नवीन चर्चा सुरू झाली आहे. एलॉन मस्क यांनी अलीकडेच जगातील मोठी टेक कंपनी गुगलला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही आव्हान दिलं आहे. जेमिनी हे त्यांचं नवीन उत्पादन लिंगभेद करत असल्याचा आरोप अलीकडेच केला. (Elon Musk XMail)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community