मुंबईकरांनो! CSMT ते वडाळा रेल्वे वाहतूक बंद; हार्बर मार्गावर 2 तासांचा विशेष ब्लॉक

119

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ एका जीर्ण भिंतीचा भाग कोसळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे CSMT ते वडाळा या रेल्वेदरम्यान रेल्वेची वाहतूक बंद राहणार आहे.

(हेही वाचा – पडळकरांना मंत्री पद द्यावं, कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र अन्…)

जीर्ण भिंतीचा भाग कोसळण्याची घटना आज, गुरूवारी सकाळी घडली. या घटनेमुळे सकाळी लोकल वाहतूक १५ मिनिटे उशिराने धावत होती. या जीर्ण भिंतीचा भाग काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या मार्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या आपात्कालीन ब्लॉकदरम्यान, सीएसएमटी ते वडाळा दरम्यान हार्बर मार्गावर लोकल ट्रेन उपलब्ध राहणार नाहीत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना कुर्ला, दादर येथून मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

काय घडली घटना

गुरूवारी, सकाळी सव्वासात वाजता मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ नागरी वस्तीच्या एका खासगी भिंतीचा काही जीर्ण भाग रेल्वे ट्रॅकजवळ कोसळला. या भिंतीचा भाग ट्रॅकवर पडल्याचे समजताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी बाजूला केला आणि साडेसात वाजल्यापासून हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हा जीर्ण भिंतीचा भाग सुरक्षित करणे महत्वाचे असल्याने गुरूवारी २ तासांचा आपात्कालीन ब्लॉक घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.