अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. (Emergency in New York) त्यामुळे रस्ते, महामार्ग आणि लोकांची घरे पाण्याखाली गेली. गाड्या आणि घरात अडकून पडलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या पथकाने वाचवले आहे. गार्डिया विमानतळावर विमाने बंद ठेवण्यात आली आहेत. काही भागातील मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. परिस्थिती पाहून न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. काही भागात रात्रभर 5 इंच (13 सेंटीमीटर) पाऊस पडला.
(हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेसवर कुणाचा अधिकार?)
दरम्यान न्यूयॉर्कमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे; परंतु पुराचा धोका अजूनही कायम आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लोकांना वरच्या मजल्यावर रहाण्यास सांगण्यात आले आहे. न्यूयॉर्क शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे अचानक पूर आला. ज्या भागात पाणी आहे, त्या भागात रहाणाऱ्या लोकांना वरच्या मजल्यावर राहण्यास सांगण्यात आले आहे. बाधित भागातील शाळांमधील मुलांना वरच्या मजल्यावर हलवण्यात आले आहे. (Emergency in New York)
I am declaring a State of Emergency across New York City, Long Island, and the Hudson Valley due to the extreme rainfall we’re seeing throughout the region.
Please take steps to stay safe and remember to never attempt to travel on flooded roads.
— Governor Kathy Hochul (@GovKathyHochul) September 29, 2023
20 तास काळजी घेणे आवश्यक – न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी हॉचुल
हे एक धोकादायक आणि प्राणघातक वादळ आहे. पुढील 20 तास काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी घरातच थांबावे. जर तुम्हाला काही कामानिमित्त घराबाहेर जावे लागत असेल, तर हवामानाबाबतचे अपडेट नक्की घ्या, असे आवाहन न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी केले आहे. (Emergency in New York)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community