Mumbai Manchester Gulf Air Flight चे कुवैतमध्ये आपत्कालीन लँडिंग; भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकले

56
Mumbai Manchester Gulf Air Flight चे कुवैतमध्ये आपत्कालीन लँडिंग; भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकले
Mumbai Manchester Gulf Air Flight चे कुवैतमध्ये आपत्कालीन लँडिंग; भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकले

प्रवाशाने एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून भारतीय परराष्ट्र आणि व्यवहार मंत्रालयाचे लक्ष वेधल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. आम्ही बहारिनवरून (Bahrain) मँचेस्टरच्या दिशेने उड्डाण केले होते. स्वाक ००७७ आपातकालीन परिस्थिती उद्भवल्याने विमान कुवैतमध्ये उतरवण्यात आले आहे. विमानतळावर अधिकारी सांगत आहेत की, फक्त ब्रिटीश आणि युरोपीय नागरिकांनाच हॉटेल उपलब्ध करून दिले जातील. कारण त्यांना आगमन व्हिजा मिळू शकतो. तुम्ही यात हस्तक्षेप करू शकता का?, असे या प्रवाशाने म्हटले होते. (Mumbai Manchester Gulf Air Flight)

(हेही वाचा – Virat Kohli : सराव सामना चुकवून विराटने केला बुमराह, अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सराव)

गल्फ एअर जीएफ ५ विमानाने मुंबईवरून मँचेस्टरसाठी उड्डाण केले होते. मध्ये बहारिन मार्गे हे विमान निघाले होते. मात्र, कुवैतमध्ये लँडिंग करण्यात आले. ६० भारतीय प्रवासी १३ तास कुवैतमध्ये अडकून पडले होते. या विमानाने सोमवारी सकाळी ४ वाजून ३४ मिनिटाने मँचेस्टरच्या दिशेने उड्डाण केले होते, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.

त्यानंतर भारतीय दूतावासाने कुवैतमधील गल्फ एअरशी संपर्क करून हा मुद्दा उपस्थित केला. दुतावासातील एक टीम प्रवाशांच्या मदतीसाठी आणि एअरलाईन कंपनीशी समन्वयासाठी विमानतळावर पाठवण्यात आली होती. भारतीय प्रवाशांची विमानतळावरील दोन लाऊंजमध्ये व्यवस्था करण्यात आली. (Mumbai Manchester Gulf Air Flight)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.