नव्या तंत्रज्ञानामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन

53
ई-ट्रान्सीट हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
  • प्रतिनिधी

राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान संवादव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे आपत्ती व्यवस्थापनाला तंत्रज्ञानाचे बळ मिळाले आहे. या नव्या अद्ययावत आपत्कालीन कार्य केंद्रामुळे आपत्तीच्या वेळी जलद, अचूक आणि समन्वित प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ आपत्तीच्या वेळीच नाही तर आपत्तीपूर्व सजगतेपासून पुनर्वसनापर्यंतची परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे हाताळता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) मंगळवारी केले.

(हेही वाचा – भाजपा नेते Kirit Somaiya यांना जीवे मारण्याची धमकी; युसूफ अन्सारीविरोधात गुन्हा दाखल)

मंत्रालयात नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हवामानातील बदलामुळे आपत्तीचे स्वरूप, तीव्रता आणि वारंवारता बदलत आहे. त्यामुळे ‘मिटिगेशन’ आणि घटनांनंतर तात्काळ प्रतिसाद यावर भर देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी एक सशक्त ‘कमांड आणि कम्युनिकेशन सिस्टीम’ असणे महत्त्वाचे असून निर्णय लवकर घेता यावेत आणि जलद प्रतिसाद देता यावा यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी व्यक्त केला.

(हेही वाचा – BMC : महापालिका आयुक्तांच्या दरबारी सकाळी शिवसेना उबाठाचे नेते, दुपारी आदित्य ठाकरे; नक्की कारण काय?)

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची आधुनिक व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नागपूर येथे प्रस्तावित आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या स्थापनेच्या निर्णयाचेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्वागत केले. खरेतर आपत्ती येऊ नये, हीच आपली इच्छा आहे. पण आलीच, तर तिच्याशी सक्षमपणे लढण्यासाठी आपली व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपत्कालीन केंद्राच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अत्यंत आधुनिक आणि सुसज्जित व्यवस्था उभी केल्याबद्दल आपत्ती व्यवस्थापन विभागास त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी,आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.