गृहकर्जाचे हप्ते थकले तरी काळजी करू नका; कारण…

163

आरबीआय सातत्याने वाढवत असलेल्या रेपो रेटमुळे गृहकर्जाचे हप्ते वाढलेले आहेत. त्यामुळे अनेकांचे टेन्शन वाढलेले आहे. अशा वेळी आरबीआयने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृह कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ केली आहे. यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज घ्यायचे की नाही, या द्विधा मनस्थिती लोक गेले आहेत. अशा संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आरबीआय मोठा दिलासा देण्याचा प्लॅन आखत आहे. आरबीआयने गेल्या वर्षभरात सहा वेळा रेपो रेट वाढविला आहे. यामुळे आता कर्जाचा ईएमआयही वाढणार आहे. असे झाल्यास महिन्याचे गणित बिघडून हप्ते थकण्याचा धोका निर्माण झाला आहे. जे लोक आता कर्ज घेणार आहेत किंवा ज्यांनी फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे, त्यांचे ईएमआय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे हे लोक ठरलेल्या वेळेत हप्ते देऊ शकतील की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे जर हप्ता थकला तर बँका जो दंड लावतात तोच बंद करण्याचा आरबीआय विचार करत आहे.

(हेही वाचा महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी; शिंदे गटाकडून होणार युक्तिवाद)

लवकर येणार गाईडलाईन 

सरासरी सर्वच बँका हप्ता थकला की त्यावर दंड म्हणून वार्षिक व्याजाच्या तुलनेत १ ते २ टक्के दंड आकारतात. जर आरबीआयने हा निर्णय घेतला तर दिलासा मिळणार आहे. आरबीआयनुसार बँका ज्या प्रकारे दंड आकारतात त्याची संपूर्ण माहिती वेगळी द्यावी लागणार आहे. हा दंड आताच्या पद्धतीने नाही तर वेगळ्या पद्धतीने आकारावा लागणार आहे. ईएमआयवरील लेट फी पारदर्शक पद्धतीने वसूल केली जाणार आहे. आरबीआयने ८ फेब्रुवारीला मॉनिटरी पॉलिसीच्या बैठकीत याबाबत लवकरच एक गाईडलाईन तयार केली जाणार असल्याचे म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.