नोकरदार PF खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविषिय निर्वाह निधी संघटना EPFO ने खातेधारकांच्या खात्यात पीएफवरील व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. याचा 7 कोटीहून अधिक पीएफ धारकांना लाभ होणार आहे. 2022 या आर्थिक वर्षाचे व्याज देण्यास ईपीएफओने सुरुवात केली असून,8.1 टक्के दराने हे व्याज देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही PF खातेधारक असाल तर आपले PF Account नक्की चेक करा.
खात्यात येणार व्याज
8.1 टक्के व्याजाच्या दरानुसार विचार केल्यास पीएफ खातेधारकांच्या खात्यात भरघोस रक्कम जमा होणार आहे. ज्या पीएफ धारकांच्या खात्यात 1 लाख रुपये रक्कम जमा असेल त्यांना व्याजाची रक्कम म्हणून 8 हजार 100 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्यांच्या खात्यात 5 लाख रुपये जमा आहेत त्यांच्या खात्यावर 40 हजार 500 रुपये जमा होणार आहे.
(हेही वाचाः 10 वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळते पेन्शन, फक्त ‘हे’ काम करा! काय सांगतो EPFO चा नियम)
असा चेक करा PF चा बॅलेन्स
- पीएफ खातेधारक EPFO च्या 011-22901406 या टोल फ्री नंबरवर रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे मिस्ड कॉल देऊन पीएफचा अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकतात.
- आपल्या रजिस्टर नंबरवरुन EPFO UAN LAN टाईप करुन 7738299899 या नंबरवर SMS करुन देखील पीएफ खातेधारक आपला अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकतात.
- EPFO च्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करुन UAN no. आणि Password द्वारे लॉग इन करुन, Passbook ऑप्शनद्वारे खातेधारकांना आपला पीएफ बॅलेन्स चेक करता येईल.
- UMANG app डाऊनलोड करुन त्यात EPFO ऑप्शन निवडा. त्यानंतर UAN no. आणि OTP द्वारे लॉग इन करुन Passbook ऑप्शनद्वारे पीएफ खातेधारकांना आपला अकाऊंट बॅलेन्स चेक करता येईल.
(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना मिळतंय 7 लाखांचं विमा संरक्षण, असा घ्या लाभ)
Join Our WhatsApp Community