राज्य सरकारच्या ७५ हजार जागांच्या मेगाभरतीला सुरूवात झाली आहे. २ हजार जणांना याअंतर्गत नियुक्तीपत्रे देण्यात आली. आता वर्षभरात सर्व ७५ हजार जागा भरण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या बांधकामालाही सुरूवात झाली आहे. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा तरुणांनी नोकऱ्या देणारे बनावे असे सरकारमार्फत सांगण्यात आले आहे. यासाठी सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत.
( हेही वाचा : बीआरटी मार्गामुळेच होतेय वाहतूक कोंडी, पोलिसांचे पुणे महापालिकेला पत्र )
लवकरच १ लाख तरुणांना रोजगाराची संधी देणार
खासगी कंपन्यांमध्ये लवकरच १ लाख तरुणांना रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकार कंपन्यांसोबत करार करेल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलीस विभागात साडेअठरा हजार जागांची भरती करू अशी घोषणाही फडणवीसांनी केली आहे.
खासगी कंपन्यांसोबत करार
खासगी क्षेत्रात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच खासगी कंपन्यांसोबत १ लाख रोजगारांबाबतचे करार (MOU)करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवण्यात येतील. यातून १ लाख तरुणांना रोजगार मिळेल.
Join Our WhatsApp Community