सुकमामध्ये सकाळपासून गोळीबार सुरु असून या कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलांनी ही आक्रमक पवित्रा घेतला. आतापर्यंत १६ नक्षलवाद्यांना (Naxalites) ठार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (Chhattisgarh)
(हेही वाचा : आता Reels दिसणार टीव्हीवर ; कसं ? वाचा सविस्तर …)
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुकमा जिल्ह्यात (Sukma District) दि. २९ मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) चकमक झाल्याची माहिती ही काही वृत्तसंस्थांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक (Anti-Naxal Operation) झाली. डीआरजी आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत नक्षलविरोधी मोहिमेवर (Anti-Naxal Operation) असताना ही चकमक घडली. (Chhattisgarh)
चकमकीत १६ नक्षलवादी ठार
सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळपाल परिसरातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाल्याचे एसपी सुकमा किरण चव्हाण यांनी सांगितले. ही चकमक अजूनही सुरू आहे. ते पुढे म्हणाले की, केरळपाल परिसरात माओवादी असल्याच्या माहितीच्या आधारे दि. २८ मार्च रोजी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कर्मचारी सहभागी आहेत.सुरक्षा दल सध्या चकमकीच्या (Anti-Naxal Operationठिकाणी आणि आजूबाजूच्या जंगलात कसून शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालू ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सविस्तर निवेदन जारी केले जाईल. (Chhattisgarh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community