सिद्धू मुसेवालाचा मारेकरी पोलीस चकमकीत ठार

104

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याला ठार करणारा मारेकरी याला भारत-पाक सीमेवरील अटारी बॉर्डरजवळ पोलीस आणि गुंडाच्या चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.

तिघांपैकी एकाला पोलिसांनी ठार केले

अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या चिचा भकना गावात ही चकमक सुरू होती. तो गुंड एका जुन्या घरामध्ये लपले आहे, हे समजले. तिघांपैकी एकाला पोलिसांनी ठार केले. चिचा भकना गावापासून पाकिस्तानची सीमा केवळ १०० मीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत हे गुंड पाकिस्तानात घुसण्याचीही शक्यता होती. घटनास्थळी पोलिसांच्या मदतीसाठी भारत-पाक सीमेवरून पोलिसांची अनेक वाहने पोहोचली. जगरूपसिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोन गुंड एका निर्जन भागात बांधलेल्या जुन्या वाड्यात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दोन तासांपासून ही चकमक सुरू होती. त्यामुळे या गुंडांकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचे म्हटले जात आहे. गुंड जगरूप सिंग उर्फ ​​रूपा याच्याबद्दल माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. जगरूप सिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोघे शार्प शूटर आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपा चकमकीत ठार झाला आहे. तर मनू एके-४७ रायफलने सतत गोळीबार करत आहे. या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा ओबीसी आरक्षणावरून आता श्रेयवादाची लढाई सुरु)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.