गणेश मंडळांनी (Ganesh Mandal Pune) आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक भावनेने उत्साहात साजरा करावा. असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. गणेशोत्सव काळात मंडळांच्या मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. (Chandrakant Patil)
मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकजुटीसह गरजू लोकांना मदत होईल, या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मांडली. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आपल्या देखाव्यांमधून महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत.
(हेही वाचा – Sexual Assault : बदलापूरची नायगावमध्ये पुनरावृत्ती; शाळेच्या कँटिंगमध्ये काम करणाऱ्याकडून ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार)
गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तसेच, जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करावे. त्यासोबतच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे. या तिन्ही गोष्टींसाठी मंडळांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा – शिवसेना खासदार Naresh Mhaske यांनी राहुल गांधींकडे केली ‘ही’ मागणी)
भाजपाचे जेष्ठ तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुणे दौऱ्यावर असून, चतु:शृंगी पोलीस ठाणे (Chatu: Shringi Police Station) व पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर मधील साफा बॅन्क्वेट हॉल येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान या बैठकीच्या वेळेस पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे शहर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह महावितरण, महापालिकेचे अधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community