पुणे (Pune) शहरातील पदपथांसह रस्त्यांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढले असून, वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त झाल्याची कबुली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), तसेच भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा बांधकामे, रस्त्यावरील अतिक्रमणे यांसह शहरातील विकासप्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू असून, महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार या नेत्यांनी मांडले. (Encroachment on Footpaths)
(हेही वाचा – शिवछत्रपतींचा जिरेटोप मस्तकावर न घालता मस्तकी लावला; CM Devendra Fadnavis यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक)
पुणे शहरातील समस्या, प्रश्न, विकासकामे याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर आदी नेते या वेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘शहरातील समस्यांबाबत महापालिकेला वारंवार सूचना करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे,’ असे मोहोळ आणि पाटील यांनी स्पष्ट केले.
आता कायमचा तोडगा हवा आहे
मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) म्हणाले, ‘प्रशासनाच्या मागणीप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाकडून पैसे मिळत आहेत. जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विकासकामांची प्रगती आहे, पण ती फार नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत प्रशासनाला अधिक वेगाने प्रकल्पांची कामे करावीत, अशी सूचना स्पष्टपणे देण्यात आली आहे. बैठक झाल्यानंतर दोन दिवस प्रशासन दक्ष होते आणि कारवाई होते. मात्र, त्यानंतर पुन्हा आधीची स्थिती येते. बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे कारवाई करून त्याचा अहवाल आम्हाला सादर करावा, पोलिसांच्या मदतीने कारवाईची ठिकाणे निश्चित करा, शहरातील अतिक्रमणांचा विषय आता संपला पाहिजे, यावर आम्हाला कायमचा तोडगा हवा आहे, असे प्रशासनाला सांगितले आहे.’ (Encroachment on Footpaths)
हेही पहा –