यंदाच्या वर्षांत चंद्रपुरात वाघांच्या वाढत्या हल्ल्याने बळींची संख्या आता ५२ वर पोहोचली आहे. चंद्रपुरात पहार्णी गावात नर्मदा भोयर (५०) या महिलेचा शुक्रवारी, ३० डिसेंबर रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर लोकांंचा रोष कमी करण्यासाठी वनविभागाने तातडीने वीस हजार रुपयांची नुकसानभरपाईची मदत देऊ केली.
चंद्रपुरात हल्लेखोर वाघांच्या शोधासाठी पुन्हा परत येतील
सध्या चंद्रपुरात वाघाला पकडण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची वन्यप्राणी बचाव पथकाची टीम कार्यरत आहे. ही टीम डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चिचपल्ली आणि सिवनी येथील हल्लेखोर वाघांचा शोध घेत आहे. या टीमसह नवेगाव तसेच अमरावती येथील वन्यप्राणी बचाव पथकाची टीम सध्या आपापल्या ठिकाणी परत गेल्या आहेत. या दोन्ही टीम सोमवारी चंद्रपुरात हल्लेखोर वाघांच्या शोधासाठी पुन्हा परत येतील. ऑक्टोबर महिन्यापासून नागभिड येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघांच्या हल्ल्यात माणसाचा बळी गेला आहे. परंतु हल्लेखोर वाघाची ओळख अद्यापही वनविभागाला निश्चितपणे सांगता येत नाही आहे. कॅमेरा ट्रेप बसवूनही नेमका हल्लेखोर वाघ ओळखण्यासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे.
(हेही वाचा सायरस मिस्त्रीनंतर ऋषभ पंत; 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन अपघात)
Join Our WhatsApp Community