भाषा (Language) हे माणसाला मिळालेले वरदान असून मानवी संस्कृतीच्या आणि बौद्धीक विकासाच्या प्रक्रियेत भाषेची भुमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. मात्र देशातील ११७ भाषा (Language) संकटात असून नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. या ११७ भाषा बोलणाऱ्यांची संख्या दहा हजारांच्या आत आहे. मुळात भाषेमुळे अनेक गोष्टी मानवाला साध्य करता येतात. जसे की, विचार मांडणे, संवाद साधणे, भावभावना व्यक्त करणे अशा अनेक गोष्टी भाषेमुळे साध्य करता येतात.
( हेही वाचा : Mohammed Shami : मोहम्मद शमीची नेट्समध्ये गोलंदाजी, व्हीडिओ व्हायरल)
दरम्यान देशातील ११७ भाषा (Language) धोक्यात असल्याची माहिती माध्यमातून प्रसारित होत आहे. या लुप्त होणाऱ्या भाषांमध्ये सर्वाधिक भाषा (Language) या दुर्गम भागातील आदिवासी समुहाच्या आहेत. त्यात दुसरीकडे जगभरात ५० टक्के लोकसंख्या चिनी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, स्पॅनिश भाषा बोलते. तर उर्वरित भाषेत इतर लोक संवाद साधतात. गोची म्हणजे, यातील काही भाषा बोलणाऱ्यांची संख्या शेकडो आणि हजारोत शिल्लक राहिली आहे. त्यात भाषातंज्ज्ञांच्या मते. शतकाच्या अखेरीस जगभरात सात हजारांपेक्षा जास्त भाषांचे नामोनिशाण मिटेल.
या आहेत संकटग्रस्त ११७ भाषा(Language)
लॅमोंगसे, लूरो, मौउठ, ओंगे, पू, सानेन्यो, सेंटीलेस, शोमपेन, तकाहयिलंग, थरूआ, भुजिया, बोडो गाडबा-गुतोब, धिमाल, मरू, बिरहोर, होलिया, बिन्झिया- बिरजिया-बिरिजिया, तोतो, दिदायी-गाता, गोरूम, थोती, बोन्डो, परेंगा, ना, तनगम, सिन्गफो, शेरदुकपेन, मेयोर- जाखरिंग, रँगलोंग, बियाते, बँगकरो, चिरू, डारलोंग, लिजू, फाकियल, कोमकार, सिमोंग, मारा, आइमोल, अतलोंग, गुरुंग, खांबा, डिरांग मोन्पा, खाम्पती, पुरूम, उचाय, नेवारी, बावम, राल्ते, थापा, बागी, चिन्ज-जाइफे, छोथे, कगाते, कामी-खामी, कोइरेंग, कोंबो, लामगांग, मोयोन, मुखिया-सोनूवर, नेवार-प्रधान, पुरोइक-सुलंग, ताराओ, युबिन-लिजू, जाखरिंग, जान्शुंग, गाहरी, स्पिती, चिनाली, डारमिया, जाद, कानाशि-मालानी, जांगालि-राजी, रोंगपे, सिराम, बेडा, खाना, भादरालियाम, खाशा, मेशाबी, पट्टारी,तेहगुल, गोजापुरी, हस्सादी,बालास्तिन, बातेरी, डागरी,कुशवाही, मासिदी, सिआन,मन्ना, कानिकेर गोट्टी, पुलिया, सिद्दी, कादार, मूपन, मुदुगा, सोलिगा, हाक्किपिक्की,मालाएमालासार, आरांदन,कुटिया, उराली, मुदुवान,पालिया, मालायन, मालासार,जेनू, कुरुम्बा, तोडा,ईरावाल्लान, भारवाड-भारवाडी, बाराडी, निहाली,भाला, दिवेही.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community