अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला कोणता राऊंड सुरु होणार?

90

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर रोजी जाहीर झाला, त्यानंतर आता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीईटी सेलच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष सुरु होणार आहे.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया?

  • २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर – विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे त्यासोबतच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फॉर्म कन्फर्मेशन या दरम्यान करावे
  • ७ ऑक्टोबर – इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल
  • ८ ते १० ऑक्टोबर – सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिला आहे
  • १२ ऑक्टोबर – इंजिनिअरिंग प्रवेशाची अंतिम यादी जाहीर होईल.

पहिल्या कॅप राउंडला सुरुवात

  • १३ ते १५ ऑक्टोबर – इंजिनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून निश्चित करायचा आहे.
  • १८ ऑक्टोबर – कॅंप राउंड १ पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • १९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत– इंजिनियरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंड १ मध्ये मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे त्यासोबतच फी भरून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे अन्यथा दुसऱ्या राउंडसाठी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची आहे.
  • २२ ऑक्टोबर – पहिला कॅप राऊंडनंतर उरलेल्या जागांचा तपशील संकेतस्थळावर जारी केला जाईल.

(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)

दुसऱ्या कॅप राउंडला सुरुवात

  • २३ ते २६ ऑक्टोबर – इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दुसऱ्या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्या ऑप्शन फॉर्म भरून निश्चित करायचा आहे.
  • २८ ऑक्टोबर – इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • २९ ते ३१ ऑक्टोबर दुपारी ५ वाजेपर्यत- इंजीनियरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंड २ मध्ये मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे त्यासोबतच फी भरून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे अन्यथा तिसऱ्या राउंड साठी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची आहे

तिसऱ्या कॅप राउंडला सुरुवात

  • १ नोव्हेंबर – कॅप राऊंड दोन नंतर उरलेल्या जागांचा तपशील जाहीर केला जाईल.
  • २ ते ४ नोव्हेंबर – इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तिसऱ्या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून निश्चित करायचा आहे.
  • ६ नोव्हेंबर – इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
  • ७ ते ९ नोव्हेंबर दुपारी ५ वाजेपर्यत – इंजीनियरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंड २ मध्ये मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे त्यासोबतच फी भरून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.