BMC : महापालिकेच्या अभियंत्यांना जुंपले मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांनाही कामाला जुंपल्याने अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे आधीच अभियंत्यांची पदे रिक्त असून त्यातच अभियंत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याने महापालिकेच्या कामांवर याचा परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.

4134
BMC School : महापालिका शाळांमधील मुले होणार क्रीडा क्षेत्रात निपुण

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अभियंत्यांनाही कामाला जुंपल्याने अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे आधीच अभियंत्यांची पदे रिक्त असून त्यातच अभियंत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याने महापालिकेच्या कामांवर याचा परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्याची मागणी अभियंत्यांचे संघटनेने केली आहे. (BMC)

मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) विविध विभागातील, रुग्णालयातील, तसेच प्रमुख खात्यांमधील विविध पदांवरील अभियंत्यांना मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) सध्या अभियंत्यांची सुमारे ७०० पदे रिक्त असून कार्यरत अभियंत्यांना अधिक वेळेत अतिरिक्त काम करावे लागते. मुंबईच्या लोकसंख्येनुसार अभियंत्यांची पदे नसल्याने व रिक्त पदांमुळे अभियंते तणावाखाली काम करीत आहे. त्यातच आता सहाय्यक अभियंत्यांना पर्यवेक्षक व दुय्यम व कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची बाबत बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने निदर्शनास आणून दिली आहे. (BMC)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार)

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे (Brihanmumbai Municipal Engineers Union) कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष व सरचिटणीस यशवंत धुरी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पाठवलेल्या निवेदनात अशा प्रकारचे सर्वेक्षण करणे ही तांत्रिक बाब नाही व अभियंत्यांची नेमणूक मुंबई महापालिकेत तांत्रिक कामे करण्यासाठीच केलेली असल्याचे म्हटले आहे. (BMC)

अभियंत्यांचे मुख्य काम हे महानगरपालिकेत सुरु असलेल्या विविध अभियांत्रिकी कामांवर देखरेख ठेवणे व कामांचा दर्जा राखणे हे आहे अभियंत्यांना या सर्वेक्षणाच्या कामांमध्ये गुंतवून ठेवल्यास चालू असलेल्या कामाचा दर्जा राखणे शक्य होणार नाही. अभियंत्यांचा अभियांत्रिकी कामांकरीताच वापर करणे हे प्रशासनाकडून अपेक्षित असल्याचे त्यांनी या पत्रात म्हणले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील अभियंता वर्गाला या सर्वेक्षणाच्या कामातून वगळावे अशाप्रकारची विनंती त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.