रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं महागणार…

आर्थिक परिस्थिती स्थिर होण्याची प्रतीक्षा

157

कोरोना लॉकडाऊननंतर महागाईने उच्चांक गाठला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर, भाज्यांच्या किमती, खाद्यतेलांचे दर गगनाला भिडले असून याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना देखील बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंटच्या मालकांनी खाद्यपदार्थांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २०२० मध्ये १ हजार ८१ होती. हीच, किंमत आता २ हजार ६४ रुपयांवर गेली आहे. शिवाय खाद्यतेलांसारख्या इतर वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. मोठी हॉटेल्स कमीत कमी भाडेवाढ करून व्यवस्थापित करू शकतात परंतु छोट्या आस्थापनांसाठी ही दरवाढ जवळपास १५ ते २० टक्क्यांच्या दरम्यान असू शकते.

आर्थिक परिस्थिती स्थिर होण्याची प्रतीक्षा

या दरवाढीवर प्रतिक्रिया देताना आहार संघटनेचे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी म्हणाले, आम्ही लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान सहन करण्यास पूर्णपणे सक्षम नाही. सरकार देखील आम्हाला परवाना शुल्क, वीज, मालमत्ता कर, पाण्याची बिले याबाबत कोणतीही सवलत देत नाही. त्यामुळे बहुतांश रेस्टॉरंट्स मेनू दर वाढवण्याची विनंती करत आहेत. परंतु आम्ही आर्थिक परिस्थिती स्थिर होण्याची प्रतीक्षा करू इच्छितो आणि आणखी ३ महिने प्रतीक्षा करू इच्छितो. असे त्यांनी स्पष्ट केले. तर, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दरवाढ झाली नसल्याने, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या दरवाढीबाबत रेस्टॉरंटचे मालक अंतिम निर्णय घेतील असे, आहार संघटनेचे सरचिटणीस सुकेश शेट्टी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – ‘या’ पद्मविजेत्या महिलेला मोदी-शहांनी केलं अभिवादन; वाचा नेमकं कारण)

केंद्र सरकारला करणार विनंती

दक्षिण भारतातील हॉटेल संघटनांचे प्रतिनिधी केंद्र सरकारला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करतील. जेणेकरून हॉटेल व्यावसायिकांना देखील काही प्रमाणात नफा होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.