गेल्या काही वर्षांत इंग्रजी शाळांचे (english medium schools) पेव फुटल्यामुळे मराठी शाळांतील (Marathi Schools) पटसंख्या रोडावत आहे. राज्यात ६ हजारपेक्षा जास्त मराठी शाळा अक्षरशः एक आकडी पटसंख्येवर आल्या आहेत. पहिली ते चौथी या एकूण चार वर्गात १० पेक्षा कमी मराठी विद्यार्थी संख्या आहेत. एकट्या बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात ५१, तर विदर्भातील (Vidarbha) ११ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या ९८६ मराठी माध्यमाच्या शाळा या विद्यार्थी नसल्याने एक आकडी पटसंख्येच्या झाल्या आहेत.
(हेही वाचा – नव्या आरोग्यसेवा निधीची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारला Bombay High Court ने घेतले फैलावर)
केंद्र सरकारने नुकताच मराठीला अभिजात भाषेचा (Marathi classical language) दर्जा दिला; मात्र त्यानंतर राज्यातील मराठी शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्याने या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचं धक्कादायक चित्र आहे. मराठी शाळांची पटसंख्या एक आकडी होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येत असून मराठी शाळांना विद्यार्थीग्रहण लागले आहे.
स्पर्धेच्या युगात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षा इंग्रजीत असतात. भविष्यातील संधींमुळे मराठी पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्यास प्राधान्य देत आहेत. ग्रामीण भागातसुद्धा इंग्रजी शाळांकडे ओढ वाढत आहे. स्पर्धेच्या युगात अनेक स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा या इंग्रजीत घेतल्या जातात म्हणून आमचा पाल्य हा त्यात टिकला पाहिजे म्हणून अनेक पालकांनी आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्रवेश घेतला, असे पालकांचे म्हणणे आहे. (Marathi Schools)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community