Prasad Kulkarni : कोरोनाकाळात अनेकांचे प्राण वाचवणारे उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांचे निधन

Prasad Kulkarni : कोरोनाकाळात प्रसाद कुलकर्णी यांनी अल्प खर्चात आणि अल्प वेळेत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले होते. प्रसाद कुलकर्णी यांना सामाजिक कार्यासोबत उद्योग विश्वातही आपले नाव कमावले होते.

178
Prasad Kulkarni : कोरोनाकाळात अनेकांचे प्राण वाचवणारे उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांचे निधन
Prasad Kulkarni : कोरोनाकाळात अनेकांचे प्राण वाचवणारे उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांचे निधन

मिरज औद्योगिक वसाहतीतील प्रसादिती मेडिकल इक्विपमेंटस् प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रसाद नारायण कुलकर्णी (वय ५१) यांचे मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी निधन झाले. (Prasad Kulkarni) २० नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात किरकोळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी रक्षाविसर्जन आहे. (Prasad Kulkarni)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : जुन्या पेन्शनवर मुख्यमंत्री घेणार निर्णय; बक्षी समितीचा अहवाल शासनाला सादर)

कोरोनाकाळात रुग्णांना स्वस्तात उपलब्ध केले व्हेंटिलेटर

कोरोनाकाळात प्रसाद कुलकर्णी यांनी अल्प खर्चात आणि अल्प वेळेत व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. कोरोनासारख्या कठीण काळात रुग्णांना उपचारासाठी तातडीची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रसाद कुलकर्णी यांनी खूप धडपड केली होती. (Prasad Kulkarni)

शून्यातून व्यावसायिक विश्वाची निर्मिती

प्रसाद कुलकर्णी यांना सामाजिक कार्यासोबत उद्योग विश्वातही आपले नाव कमावले होते. कोणताही वारसा नसताना त्यांनी शून्यातून स्वतःचे व्यावसायिक विश्व निर्माण केले आणि अल्पावधीतच तरुण उद्योजक म्हणून नावलौकिकही मिळवला होता. प्रसाद कुलकर्णी यांच्यावर हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव होता.

(हेही वाचा – Aditya Thackeray : आदित्य ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर, खळा बैठकीतून जनतेशी साधणार संवाद)

अनेक सामाजिक उपक्रमांत सहभाग

कुलकर्णी यांनी १९९५ मध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्नी आदिती यांच्यासमवेत प्रसादिती कंपनीची स्थापना केली. वैद्यकीय उपकरणे बनवण्याच्या त्यांच्या उद्योगाचा लौकिक देश-परदेशात होता. त्यांचे अनेक संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले होते. वालचंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतही ते सक्रिय होते. अनेकविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड तयार व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, यासाठी विविध प्रदर्शन घेत शाळांमध्ये उपक्रम घेतले होते. (Prasad Kulkarni)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.