Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान महत्त्वाचे; अंकित शहा यांचे प्रतिपादन

Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : आपण इतक्‍या धनाचा संचय करू नये की, अन्‍य गरीब होतील आणि त्‍यांना फूकट देण्‍याची वेळ येईल. एखाद्याला फूकट देणे किंवा विनामूल्‍य देण्‍याची पद्धत कार्ल मार्क्‍स याने रूढ केली, असे शाह म्हणाले.

142
Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान महत्त्वाचे; अंकित शहा यांचे प्रतिपादन
Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान महत्त्वाचे; अंकित शहा यांचे प्रतिपादन

अर्थशास्‍त्रज्ञ अ‍ॅडम स्‍मित यांचे अर्थकारण भांडवलशाहीवर आधारित आहे. त्‍यामुळे जगातील ९० टक्‍के संपत्ती ५ टक्‍के लोकांकडे जमा झाली. विश्‍वातील १०० श्रीमंत लोकांची सूची सिद्ध केली जाते. अशा प्रकारे वैयक्‍तिकरित्‍या संपत्तीचा संचय होणे विश्‍वासाठी योग्‍य नाही. आपण इतक्‍या धनाचा संचय करू नये की, अन्‍य गरीब होतील आणि त्‍यांना फूकट देण्‍याची वेळ येईल. एखाद्याला फूकट देणे किंवा विनामूल्‍य देण्‍याची पद्धत कार्ल मार्क्‍स याने रूढ केली. मतांच्‍या राजकारणातून फुकट सुविधा किंवा वस्‍तू देण्‍याची पद्धत वाढली आहे. भारतीय अर्थशास्‍त्र मात्र आत्‍मनिर्भर बनवते. सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान अतिशय महत्त्वाचे आहे, ,असे वक्‍तव्‍य गुजरातमधील हिंदुत्‍वनिष्‍ठ अंकित शहा (Ankit Shah) यांनी केले. ते ‘मंदिर अर्थशास्‍त्र’ या विषयावर बोलत होते. २४ ते ३० जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ते बोलत होते.

(हेही वाचा – Budget Session 2024 : शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण)

मंदिरांची अर्थव्‍यवस्‍था नष्‍ट झाल्‍यामुळेच भारता साम्‍यवाद आणि भांडवलशाही आली

अंकित शहा पुढे म्हणाले की, सनातन धर्मामध्‍ये मंदिरांच्‍या अर्थकारणातून शिक्षणप्रणाली चालवली जात होती. मंदिरांमधील अर्थव्‍यवस्‍थेवरून गावांची निर्मिती होत होती. इंग्रज भारतामध्‍ये आल्‍यावर त्‍यांनी ‘शिक्षण विभाग’ ही पद्धत चालू केली.

भारतामध्‍ये शिक्षणाचे संचलन राजा कधीही करत नव्‍हता. भारतातील शिक्षणपद्धत मंदिराच्‍या अर्थकारणातून चालत होती. ऋषिमुनी अभ्‍यासक्रम निश्‍चित करत होते. राजा भ्रष्‍ट झाल्‍यावर आर्य चाणक्‍यांनी समाजाला संघटित करून राजा धनानंद याला सत्ताच्‍युत केल्‍याचे उदाहरण आपल्‍या इतिहासात आहे. ब्रिटिशांनी शिक्षणप्रणाली सरकारच्‍या कह्यात दिली. ‘नोकरीसाठी शिक्षण’ ही पद्धत ब्रिटिशांनी रूढ केली. मागील ४०० वर्षांमध्‍ये हे झाले आहे. गुरुकुल हे मंदिराच्‍या परिसरातच असावे. मंदिरांची अर्थव्‍यवस्‍था नष्‍ट झाल्‍यामुळेच भारता साम्‍यवाद आणि भांडवलशाही आली. यांचा पुरस्‍कार करण्‍याऐवजी मंदिरांवर आधारित अर्थव्‍यवस्‍थेचे ज्ञान आपण पाश्‍चात्‍यांना दिले पाहिजे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.