Pune : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना ‘या’ दिवसापासून प्रवेश बंदी

मंगळवार, ५ मार्चपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

366

पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लोंढ्यांमुळे पुण्यात कायदा वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर, अहमदनगर व इतर ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश केल्यामुळे ही कोंडी अधिक होते. त्यामुळे या भागातून येणाऱ्या जड वाहनांना पुणे शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मंगळवार, ५ मार्चपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यात शहरात विविध मोठे प्रकल्प सुरू असून अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना धोका निर्माण होण्याबरोबरच त्यांची गैरसोय होते. त्यामुळे जड- अवजड माल वाहतूक करणारे ट्रेलर, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने वाहनांसाठी प्रायोगिक तत्वावर पाच मार्चपासून शहरात प्रवेश बंदीचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी काढले आहेत.

या मार्गावर २४ तास प्रवेश बंदी 

  • पुणे नगर मार्गावरून वाघोलीपासून पुणे शहराकडे जड वाहनांस २४ तास प्रवेश बंद
  • पर्यायी मार्ग : पुणे नगर रस्त्यावरून शिक्रापूर येथून उजवीकडे वळण घेऊन चाकण मार्गे पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे मार्गे मुंबईकडे जातील. या मार्गावरूनच अहमदनगरकडे वाहने जातील.
  • पुणे सोलापूर व पुणे सासवड रस्त्याने येणाऱ्या वाहनांना हडपसर नोबल हॉस्पिटल चौक खराडी बायपास चौकाकडे २४ तास प्रवेश बंद राहील.
  • पर्यायी मार्ग १ : पुणे सोलापूर रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी थेऊर फाटा येथून उजवीकडे वळण घेऊन थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे जावे.
  • पर्यायी मार्ग २ : पुणे सासवड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी हडपसर येथे ‘यु टर्न’ घेऊन थेऊर फाटा येथून डावीकडे वळण घेऊन थेऊर, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे पर्यंत जावे.

(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवारांमुळे शरद पवार गट अडचणीत; कारण…)

या मार्गावरवरील वाहनांना सकाळी सात ते नऊपर्यंत प्रवेश बंद

  • पुणे सोलापूर रस्ता येथून सातारा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर येथून डावीकडे वळण घेऊन सासवड रस्त्यावरून मंतरवाडी फाटा उजवीकडे वळण घेऊन खडी मशीन चौक ते कात्रज चौक येथून सातारा कडे किंवा नवले पुल मार्गे मुंबईकडे जातील. तसेच सासवडकडुन येणाऱ्या वाहनांनी मंतरवाडी चौकामधून डावीकडे वळण घेवून वरील मार्गाचा वापर करावा.
  • मुंबईकडुन येणारी वाहने नवले पूल डावीकडे वळण घेवून कात्रज चौक तसेच साताराकडुन येणारी वाहने कात्रज चौक येथून खडी मशीन चौक, मंतरवाडी चौक डावीकडे वळण घेऊन हडपसर मार्गे सोलापूरकडे व मंतरवाडी चौकामधून उजवीकडे वळण घेऊन सासवडकडे जातील.

या ठिकाणापासून २४ तास प्रवेश बंद

  • सोलापूर रस्ता नोबल हॉस्पिटल चौक
  • अहमदनगर रस्ता केसनंद फाटा वाघोली
  • मुंबई पुणे रस्ता हॅरीस ब्रीज
  • औंध रस्ता राजीव गांधी पुल
  • बाणेर रस्ता हॉटेल राधा चौक
  • पाषाण रस्ता रामनगर जंक्शन
  • पौड रस्ता चांदणी चौक
  • सिंहगड रोड वडगाव पुल चौक
  • सातारा रस्ता कात्रज चौक
  • सासवड रस्ता (बोपदेव घाट मार्ग) खडी मशीन चौक
  • कात्रज मंतरवाडी बायपास रस्ता उंड्री चौक
  • आळंदी रस्ता बोफखेल फाटा चौक

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.