आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण! ट्वीट करत दिली माहिती

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट

आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करुन घ्यावी, असं ट्वीट करत त्यांनी आपल्या जवळच्या लोकांना जागरुक केले आहे. तसेच नियमांचे पालन करत आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी या ट्वीटद्वारे नागरिकांना केले आहे.

राज्यात कोरोनाचा चढता आलेख

याआधीही राज्यातील अनेक मंत्री तसेच नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत हा कोरोना पोहोचला आहे. गेले अनेक दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कोरोना पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरत आहे. काल राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही २५ हजार ६८१ इतकी होती, तर ७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ही ३ हजार ६२ इतकी झाली होती. त्यामुळे आता राज्यातला हा कोरोनाचा चढता आलेख राज्याची चिंता वाढवणार असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here