सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबवून पर्यावरणासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या पुण्यातील 10 हजार 853 सदनिकाधारकांना करातून सवलत देण्यात आल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली. तसेच शहरातील जास्तीत जास्त सोसायटीधारकांनी पर्यावरणपूरक सोसायट्या करून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे यासाठीच ही पर्यावरणपूरक सवलत योजना सुरू करण्यात आली आहे असेही ते म्हणाले.
( हेही वाचा : १ लाख तरुणांना रोजगाराची संधी; सरकार करणार खासगी कंपन्यांसोबत करार )
याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, पुण्यातील 42 मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या सोसायट्यांमध्ये 10 हजार 853 सदनिका आहेत. या सर्व सदनिका धारकांना तब्बल 55 लाखांची कर सवलत देण्यात आली आहे. या कर सवलतीमधून सोसायट्यांना त्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यासाठी 25 ते 50 टक्के रक्कम प्राप्त झाली. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त सोसायटीधारकांनी पर्यावरणपूरक सोसायट्या निर्माण करून सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील थेरगावात सर्वाधिक पर्यावरणपूरक सोसायट्या
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूंनी वाढत असताना मोठ मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, या इमारती उभ्या राहत असताना त्या पर्यावरणपूरक कशा होतील, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे सवलत योजनांमध्ये दिवसेंदिवस सोसायट्यांची संख्या वाढत आहे. थेरगावात 10 सोसायट्यांमधून 1 हजार 904, पिंपरी वाघेरेतून 4 सोसायट्यांमधून 1 हजार 877, वाकडमधून 6 सोसायट्यांतून 1 हजार 664 तर चिंचवडमधून 7 सोसायट्यांतून 1 हजार 416 सदनिकाधारकांना पर्यावरणपूरक सवलतीचा लाभ मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community