मुंबई, ठाणे, कल्याणसह नवी मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

145

कोरोना काळ संपून जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. जानेवारी महिन्यातील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरुन सरकारी यंत्रणांमध्ये वाद सुरु आहे. गेल्या संपूर्ण वर्षात हवेचा दर्जा बऱ्यापैकी ढासळला होता, याचा अहवाल देत पर्यावरणतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपने यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुंबई तसेच महानगर परिसरात गेल्या वर्षी बराच काळ हवेचा दर्जा ढासळल्याचा अहवाल प्रा. सुरेश चोपणे यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या ईमेलला मुख्यमंत्री कार्यालयाने पर्यावरण विभागाला ही बाब पाठवल्याची लिखित माहिती दिली.

अभ्यासाचे कारण –

मुंबईत सातत्याने सुरु असलेली बांधकाम, रस्त्यांचा दर्जा तसेच वाहतूक कोंडी यामुळे वायू प्रदूषणात भर टाकली जात आहे. मुंबईतील विविध ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारी यंत्रणा बसवली आहे. मुंबईसह महानगर प्रदेश तसेच राज्यातील इतर भागांत मिळून तब्बल ६९ हवेची मोजमाप करणारी यंत्रणा सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यान्वित आहेत. कोरोनाकाळात २०२० आणि २०२१ साली मुंबई व नजीकच्या भागांत नोकरदार वर्ग घरातूनच ब-यापैकी काम करत होता. २०२२ साली जनजीवन पुन्हा पूर्ववत झाले. वर्षभरात मुंबई व महानगरांतील हवेच्या गुणवत्तेचा ग्रीन प्लेनेट सोसायटी या पर्यावरणप्रेमी संस्थेने अभ्यास केला. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध भागांत मोजल्या जाणा-या हवेची गुणवत्ता दर्शवणा-या स्थानकांवरील माहिती वापरली गेली. या अभ्यासानुसार २०२२ साली मुंबईतील प्रदूषणाचे २८० दिवस, कल्याण येथे २८३, ठाण्यात २७६ आणि नवी मुंबईत २५७ दिवस नोंदवले गेले.

नोंदीतही हलगर्जीपणा

२०२२ सालच्या हवेच्या गुणवत्ता नोंदणीत ठाण्यात ८१ दिवस स्थानकांत हवेची गुणवत्तेची नोंदच झाली नाही. कल्याणमध्ये दोन महिने, मुंबईत दीड महिने तसेच नवी मुंबईत ३४ दिवस स्थानकांतून हवेच्या गुणवत्तेची नोंद झाली नाही.

कल्याण विभागातील नोंद – ६० दिवसांची आकडेवारी वगळता

  • २२ दिवस प्रदूषणमुक्त असल्याने कल्याणवासीयांनी सुखाचा श्वास घेतला, १०१ दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक होती.
  • हवेची गुणवत्ता १२७ दिवस जास्त प्रदूषणाची दिसून आली. ५१ दिवस हवेत प्रदूषण होते.
  • ३ दिवस हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर आढळून आली. एक दिवस कल्याणमध्ये हवेची गुणवत्ता ४०० प्रति क्युबीकमीटरपलीकडे गेल्याने हा दिवस कल्याणवासीयांसाठी अतिधोकादायक ठरला.

मुंबई विभाग – पवई केंद्र (४५ दिवसांची आकडेवारी वगळता)

  • ४० दिवस मुंबई प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी होती. १३६ दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक दिसून आली. १०४ दिवस मुंबईतील हवेत जास्त प्रदूषण असल्याने धोकादायक स्थिती होती.
  • ३७ दिवस मुंबईतील हवेत अतिशय जास्त प्रदूषण होते. ३ दिवस मुंबईतील हवेचा दर्जा हानिकारक होता.

नवी मुंबई (३४ दिवसाची आकडेवारी वगळता)

  • ७४ दिवस प्रदूषणमुक्त असल्याने नवीमुंबईकरांचे आरोग्य चांगले होते. ५७ दिवस नवी मुंबईतील हवेच्या प्रदूषणात साधारण पातळीवर हवेची गुणवत्ता आढळली.
  • ९६ दिवस नवी मुंबईत अतिप्रदूषण होते. १९ दिवस नवी मुंबईतील हवा आरोग्यासाठी अतिशय धोकादायक होती.
  • एक दिवस नवी मुंबईतील हवेचा दर्जा ४०१ प्रति क्युबीट मीटरच्याही पुढे गेला होता. या नोंदीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

ठाणे

  • ठाणेकरांनी ८ दिवस प्रदूषणमुक्त दिवस अनुभवला. ८२ दिवस प्रदूषणाची पातळी समाधानकारक होती.
  • १४० दिवस ठाण्यात जा्सत प्रदूषण होते. ५१ दिवस अतिशय प्रदूषणाचे होते.
  • ३ दिवस वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक हवेची गुणवत्ता दर्शवली गेली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.