मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत झाडे लावण्याची मोहीम महामार्ग विभागाने हाती घेतली आहे. परंतु महामार्ग विभागाकडून परदेशी झाडे लावली जात असल्यामुळे त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. पेढे (ता. चिपळूण) येथे लावलेले परदेशी गुलमोहर जातीचे वृक्ष सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी काढायला लावली आणि देशी जातीचे वृक्ष लावण्याची सूचना केली.
याबाबत माहिती देतांना शाहनवाज शाह म्हणाले की, “सध्या राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. या तापमानवाढीची अनेक कारणे समोर आली आहेत. परदेशी वृक्षांची संख्या वाढल्यानेदेखील स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत आहे. त्यामुळे महामार्गाच्या शेजारी स्थानिक जातीचे वृक्ष लावावे, अशी सूचना आम्ही महामार्ग विभागाला केली होती. उन्हाळ्यात परदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होत असते. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. यामुळे जमिनीची उष्णता वाढते आणि तापमानात बदल होतो. परदेशी झाडांपैकी ५५ टक्के झाडांच्या प्रजाती मूळ अमेरिकेतील आहेत. बॉटनिक गार्डनच्या विकासासाठी इंग्रजांच्या काळात आपल्याकडे परदेशी झाडे आणली गेली आणि तेच पुढील काळातदेखील चालत राहिले.”
(हेही वाचा – BJP : भाजपचे विविध राज्यांत बैठकांचे सत्र; काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार)
शाह पुढे म्हणाले, “परदेशी झाडे निरुपयोगी ठरतात. त्यांच्या वाढीसाठी जास्त पाणी लागते. विदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत, घरटेदेखील बनवत नाहीत. परिसरातील सौंदर्य वाढवण्यासाठी या झाडांचा अधिक वापर होतो. मात्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला स्थानिक जातीची झाडे हवीत. तशी सूचना महामार्ग विभागाला केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community