भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO च्या माध्यमातून पेन्शनच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना कर्मचारी पेन्शन योजना 1995(EPS-95) अंतर्गत आपल्या पीएफ खात्यातून रक्कम काढता येणार आहे. यामुळे पीएफधारकांना सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा शिल्लक असल्यास आपल्या पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची परवानगी मिळणार आहे.
पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय
ईपीएफओची सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्ट(सीबीटी)च्या बैठकीत याबाबत शिफारस करण्यात आली होती. तसेच सीबीटीने वर्षांहून अधिक काळ योजनेचा भाग असलेल्या सदस्यांना समानुपातिक पेन्शन लाभ देण्याची शिफारस केली आहे. यामुळे निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्तीचे लाभ निश्चित करताना जास्तीचे निवृत्तीवेतन मिळण्यास मदत होणार आहे.
(हेही वाचाः पुणे ग्रामीण विभागात अनिश्चित काळासाठी सीएनजी पंप बंद, कर्मचा-यांचा बेमुदत संप)
ग्राहकांना होणार फायदा
नोकरदारांना दिलासा देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 31 ऑक्टोबर रोजी अशा ग्रहकांसाठी ईपीएस-1995 मधील रक्कम काढण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांचा फक्त सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा कालावधी आहे त्यांना लाभ घेता येणार आहे. केंद्रीय कामगार भूपेंद्र यादव यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. याचा पीएफधारकांना मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community