EPF Pension Scheme 2014: EPF पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! कोट्यवधी कर्मचा-यांना होणार फायदा

183

कर्मचारी पेन्शन योजना(EPF Pension Scheme)2014 बाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ही योजना वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे देशभरातील करोडो कर्मचा-यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

2014 च्या कर्मचारी निवृत्ती वेतन(सुधारणा) योजनेतील तरतुदी या कायदेशीर आणि वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. तसेच पेन्शन फंडात सहभागी होण्यासाठी दर महिना 15 हजार रुपये पगाराची अटही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यू.यू.लळीत,न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि सुधांशू धुलिया यांनी याबाबतचा निर्णय दिला आहे.

(हेही वाचाः कोरोनाचा शाळांनाही बसला फटका, 20 हजारांहून अधिक शाळांना लागले कुलूप)

महागाई भत्त्याची सीमा 15 हजार

बेसिक पगार आणि महागाई भत्त्याची सीमा ही 15 हजार रुपये प्रतिमाह असल्याचे 2014 च्या संशोधनात समोर आले होते. त्याआधी ही सीमा 6 हजार 500 इतकी होती. त्यामुळे कर्मचा-यांना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त पगारावर 1.16 टक्क्यांचे अतिरिक्त योगदान द्यावे लागत होते. हे योगदान देण्याची अट ऐच्छिक असेल असे सांगत सहा महिन्यांसाठी ही अट निलंबित करण्यात आली होती.

सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करा

तसेच ज्या कर्मचा-यांनी पेन्शन योजनेत सामील होण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही त्यांना सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असेही न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. केरळ,राजस्थान आणि दिल्ली उच्च न्यायालयांनी याबाबत दिलेला निर्णय लक्षात घेऊन कट-ऑफ तारखेपर्यंत योजनेत सहभागी न झालेल्या पात्र कर्मचा-यांना अतिरिक्त संधी देण्यात यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

(हेही वाचाः भाजपचे ‘हे’ आमदार,खासदार होणार बिगरनिधीचे, खर्चासाठी पक्षाची संमती लागणार)

2014 ची EPF योजना रद्द करणा-या केरळ,राजस्थान आणि दिल्ली उच्च न्यायालयांच्या निर्णयांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.