EPF Rules Change : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील ईडीएलआय योजना नेमकी काय आहे?

ईडीएलआय योजनेत अलीकडे तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत.

60
EPF Rules Change : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील ईडीएलआय योजना नेमकी काय आहे?
EPF Rules Change : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील ईडीएलआय योजना नेमकी काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

पगारदार व्यक्ती आपल्या भविष्यनिर्वाह निधीसाठीचं (Provident Fund) खातं ईपीएफओ कार्यालयात (EPFO ​​office) काढत असते. पगारातून दर महिन्याला वळत्या होणाऱ्या रकमेवर तुम्हाला सरकारी दराने व्याज मिळत असतं. निवृत्तीनंतरच्या निर्वाहासाठीची रक्कम म्हणून या गुंतवणुकीकडे पाहिलं जातं. आणि पगारदार व्यक्तींमध्ये हे गुंतवणुकीकं साधन लोकप्रियही आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिलं जातं. कारण, ईपीएफओ हे सरकारी कार्यालय (EPFO ​​office) आहे.

ईपीएफओ अंतर्गत पगारदार व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विमा कवच असावं म्हणून ईडीएलआय (EDLI) ही विमा योजना अलीकडेच आणण्यात आली आहे. या योजनेत ईपीएफओनं मोठे बदल केले आहेत. ज्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा मिळेल.

ईडीएलआय योजना हा ईपीएफचा (EDLI) भाग आहे. ज्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याची विमा रक्कम त्याच्या कुटुंबीयाला मिळते.

(हेही वाचा – मतदारयादीतील कथित घोळ; Political Party यांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण)

1. पहिल्या नोकरीच्या पहिल्या वर्षात विमा संरक्षण

यापूर्वी एखादा कर्मचारी नोकरी लागल्यानंतर पहिल्या वर्षात दगावल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळत नव्हतं. नव्या नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाला किमान ५०,००० रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. याचा फायदा किमान ५ हजार कुटुंबांना होणार आहे. (EPF Rules Change)

2. नोकरी सुटल्यानंतर देखील फायदा

पहिल्यांदा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी सुटल्यानंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ईडीएलआयचा (EDLI) फायदा मिळत नसे. आता नव्या नियमानुसार जर शेवटच्या ईपीएफ योगदानानंतर सहा महिन्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा रक्कम मिळेल. मात्र,त्याचवेळी कर्मचाऱ्याचं नाव कंपनीच्या रोलवरुन पूर्णपणे हटवलं असून नये. (EPF Rules Change)

(हेही वाचा – भगवान श्रीकृष्णाचा पोशाख आणि दागिने मुस्लिमांकडून खरेदी करू नये; Dinesh Falahaari यांचे वृंदावनातील मंदिराला निवेदन)

नोकरी बदलली तरी विमा संरक्षण

पहिल्यांदा काही कर्मचारी नोकरी बदलायचे त्यावेळी ते काही दिवस किंवा आठवडे बेरोजगार रहायचे. ती नियमित सेवा मानली जायची नाही. त्यामुळं कुटुंबाला विमा रक्कम मिळत नसे. मात्र आता दोन नोकऱ्यांमध्ये दोन महिन्यांपर्यंतचं अंतर असेल तर ती सेवा निरंतर मानली जाईल.त्या कुटुंबाला देखील विमा रक्कम मिळेल. याचा फायदा जवळपास १००० कुटुंबांना होईल.

आता कुटुंबाला किमान अडीच लाख ते सात लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळेल. सध्या व्याज ८.२५ टक्के मिळणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजनं (Central Board of Trustees) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ईपीएफचा व्याज दर ८.२५ टक्के निश्चित केला आहे. ईपीएफओच्या मतानुसार दरवर्षी १४,००० कुटुंबांना फायदा होईल. यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.