EPFO: PF मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल, आता होणार दुप्पट फायदा

95

पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. पीएफ खात्यामधून आपल्याला अडचणीच्या काळात आगाऊ रक्कम काढता येते. ऑनलाईन माध्यमातून सुद्धा ही रक्कम पीएफ खातेधारकांना काढता येते. पण आता पीएफ खात्यातील रक्कमेपेक्षा दुप्पट रक्कम आता पीएफ खातेधारकांना काढता येणार आहे.

काय आहे सुविधा?

कोरोना संकट काळात अनेकांना फार मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पीएफ खातेधारकांसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. EPFO ने सुरुवातीला कर्मचा-यांना नॉन रिफंडेबल अॅडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. पण आता या सुविधेच्या माध्यमातून खातेधारकांना दुप्पट किंवा दोन वेळा पैसे काढण्याची सुविधा देण्यात येणार आहे. म्हणजेच आधी केवळ एकदाच ही अॅडव्हान्स रक्कम काढता येत होती, ती आता दोन वेळा काढणे शक्य होणार आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याला आर्थिक त्रास होऊ नये म्हणून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ही विशेष सुविधा सरकारकडून देण्यात येत आहे.

(हेही वाचाः Whatsapp आणणार मोठे अपडेट, आता Status मधून लोकांना ऐकवा आपला ‘आवाज’)

अशी काढा रक्कम

  • ही रक्कम काढण्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबससाईटवर विझिट करा.
  • त्यानंतर आपला UAN आणि पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करा.
  • त्यानंतर फॉर्मची निवड करा.
  • आता एका नवीन वेबपेजवर तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख आणि तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार नंबर एंटर करा.
  • आता आपला बँक अकाऊंट नंबर एंटर करुन verify बटणवर क्लिक करा.
  • त्यानंतर आलेल्या पॉप-अपमध्ये सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग द्यावे लागेल.
  • पुढे ड्रॉपल डाऊन मेनूमधून पीएफ अॅडव्हान्स(फॉर्म 31) हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून पैसे काढण्याचा फॉर्म पँडेमिक (Covid-19) निवडावा लागेल.
  • आता रक्कम एंटर करुन चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा.
  • आता आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल तो एंटर करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.