EPFO कडून ग्राहकांना मोठा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे EPFOच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. या खातेधारकांना 7 लाख रुपयांचा मोफत लाभ मिळणार आहे. पण यासाठी खातेधारकांना ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. ईपीएफओने एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली आहे.
EPFO कडून नुकतेच पीएफ खातेधारकांना ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे हे नॉमिनेशन केलेल्या खातेधारकांच्या नॉमिनीला पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ देण्यात येऊ शकतो. सर्व खातेधारकांना ऑनलाईन माध्यमातून ई-नॉमिनेशन करता येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करुन ई-नॉमिनेशन करायचे आहे.
(हेही वाचाः EPFO: PF मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल, आता होणार दुप्पट फायदा)
असे करा ई-नॉमिनेशन
- ई-नॉमिनेशन करण्यासाठी EPFO ची ऑफिशियल वेबसाईट https://www.epfindia.gov.in/ ला व्हिझिट करा
- त्यानंतर Services सेक्शनमध्ये For Employees ऑप्शन सिलेक्ट करा
- त्यानंतर आपला UAN no. आणि password टाकून लॉग इन करा
- Manage Tab सिलेक्ट करुन e-Nomination वर क्लिक करा, Provide Details टॅबवर क्लिक करुन, सेव्ह बटन दाबा
- Family Declaration साठी Yes वर क्लिक करुन Add Family Details वर क्लिक करा
- नाॅमिनीचा फोटो, आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल आणि बँक अकाऊंटची माहिती यात द्यावी लागेल
- इथे Nominee Details अॅड करुन Save EPF Nomination वर क्लिक करा
- त्यानंतर ओटीपी जनरेशनसाठी E-sign ऑप्शन निवडा आणि आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर एंटर करा
- हे केल्यानंतर आपले e-nomination EPFO वर रजिस्टर होईल