EPFO: PF खातेधारकांना मिळणार 7 लाखांचा लाभ, त्यासाठी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम

113

EPFO कडून ग्राहकांना मोठा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे EPFOच्या खातेधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. या खातेधारकांना 7 लाख रुपयांचा मोफत लाभ मिळणार आहे. पण यासाठी खातेधारकांना ई-नॉमिनेशन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. ईपीएफओने एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करत याबाबतची माहिती दिली आहे.

EPFO कडून नुकतेच पीएफ खातेधारकांना ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे हे नॉमिनेशन केलेल्या खातेधारकांच्या नॉमिनीला पीएफमधील सामाजिक सुरक्षा संबंधित सुविधेचा लाभ देण्यात येऊ शकतो. सर्व खातेधारकांना ऑनलाईन माध्यमातून ई-नॉमिनेशन करता येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करुन ई-नॉमिनेशन करायचे आहे.

(हेही वाचाः EPFO: PF मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल, आता होणार दुप्पट फायदा)

असे करा ई-नॉमिनेशन

  • ई-नॉमिनेशन करण्यासाठी EPFO ची ऑफिशियल वेबसाईट https://www.epfindia.gov.in/ ला व्हिझिट करा
  • त्यानंतर Services सेक्शनमध्ये For Employees ऑप्शन सिलेक्ट करा
  • त्यानंतर आपला UAN no. आणि password टाकून लॉग इन करा
  • Manage Tab सिलेक्ट करुन e-Nomination वर क्लिक करा, Provide Details टॅबवर क्लिक करुन, सेव्ह बटन दाबा
  • Family Declaration साठी Yes वर क्लिक करुन Add Family Details वर क्लिक करा
  • नाॅमिनीचा फोटो, आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल आणि बँक अकाऊंटची माहिती यात द्यावी लागेल
  • इथे Nominee Details अ‍ॅड करुन Save EPF Nomination वर क्लिक करा
  • त्यानंतर ओटीपी जनरेशनसाठी E-sign ऑप्शन निवडा आणि आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर एंटर करा
  • हे केल्यानंतर आपले e-nomination EPFO वर रजिस्टर होईल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.