EPFO: आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून अकाऊंटवर येणार PF चे व्याज

121

नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.लवकरच EPFO कडून 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज पीएफ अकाऊंटवर जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे सात करोडपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. जून महिन्याच्या शेवटी हे पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा: EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)

या तारखेपासून येऊ शकतात पैसे

EPFO कडून पीएफच्या व्याजदराप्रमाणे हिशोब करण्यात आला आहे. 8.1 व्याजदराने हे व्याज मिळणार आहे. 16 जूनपासून कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटवर हे पैसे ट्रान्सफर केले जाणार असून, 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. दर दिवशी साधारणपणे अडीच ते पाच लाख लोकांच्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर होणार असून, 7 करोडपेक्षा जास्त पीएफधारकांना हा लाभ मिळणार आहे.

(हेही वाचा: आठवड्यातून रविवार येतील ना हो तिनदा, ऑफिसच्या सुट्ट्यांबाबत केंद्र सरकार नवे कायदे लागू करण्याच्या तयारीत)

असा चेक करा EPFO अकाऊंट बॅलेन्स

आपल्या पीएफ अकाऊंटचा बॅलेन्स चेक करण्यासाठी पीएफ धारकांनी epfindia.gov.in या वेबसाईटवर e-passbook ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपलं युजरनेम(UAN No.) आणि पासवर्ड टाकून आपला मेंबर आयडी सिलेक्ट करा.त्यानंतर तुम्हाला तुमचा पीएफ बॅलेन्स तपासता येईल.

(हेही वाचा: EPFO Interest Rate: PF च्या व्याजदरात 43 वर्षांतील सर्वात मोठी घसरण )

पीएफच्या व्याजदरात घसरण

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच पीएफचे व्याज ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. हा दर कमी असल्यामुळे 2021-22 च्या आर्थिक वर्षातील व्याज डिसेंबरच्या आधीच खात्यात जमा करण्याचा विचार करण्यात येत आहे. गेल्या 43 वर्षांत पहिल्यांदाच पीएफचा दर इतका कमी झाल्याचे बोलले जात आहे. 1977-78 साली पीएफचा व्याजदर कमी होता. 2020-21 या आर्थिक वर्षात हा व्याजदर 8.5 टक्के करण्यात आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.