पीएफ खातेदारांसाठी महत्वाची बातमी! १ जूनपासून आधार लिंक सक्ती! 

भविष्य निर्वाह निधी कार्यालया (EPFO)ने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये कामगारांचे आधार कार्ड लिंक करण्याची जबाबदारी ही कंपन्यांची आहे.

88

ज्या कामगारांचे भविष्य निर्वाह निधी खाते त्यांच्यासाठी आणि संबंधित कंपन्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या १ जूनपासून सर्व पीएफ खातेदारांचे आधारकार्ड हवं त्यांच्या खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे. कारण ज्या खाते आधार  कार्डशी लिंक नसेल त्या खात्यात कंपनीचे योगदान जमा केले जाणार नाही.

… तर इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न भरता येणार नाही!

भविष्य निर्वाह निधी कार्यालया (EPFO)ने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये कामगारांचे आधार कार्ड लिंक करण्याची जबाबदारी ही कंपन्यांची आहे. अधिसूचनेनुसार, तसे न केल्यास कर्मचाऱ्याचे योगदान खात्यात जमा होणार नाही. EPFO ने सामाजिक सुरक्षा कोड 2020 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, ज्या खातेदारांचे खाते 1 जूननंतर आधारशी लिंक केले जाणार नाही, अशा खातेदारांना इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न भरता येणार नाही. त्यामुळे खातेधारकांना पीएफ खात्यात कंपनीने दिलेले योगदान मिळविणे कठीण जाईल. कर्मचाऱ्यांना फक्त त्यांचे स्वत:चे योगदान खात्यात दिसेल.

(हेही वाचा : चक्रीवादळात पडलेल्या ‘त्या’ झाडांच्या खड्ड्यांना नवसंजीवनी!)

UAN ला आधार जोडणे सक्तीचे!

पीएफ खात्यास आधारशी जोडणे बंधनकारक करण्याबरोबरच UAN बाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांतर्गत सर्व खातेधारकांचे UAN देखील आधारशी जोडणे आवश्यक आहे. ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम आपले खाते आधार कार्डाशी लिंक करा आणि आधार यूएएनलाही पडताळून पाहा, म्हणजे खात्यात कंपनीने जमा केलेल्या रकमेमध्ये तुम्हाला अडचण उद्भवणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.