EPFO: PF च्या नियमांत मोठा बदल, आजच करा हे काम नाहीतर होईल नुकसान

99

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(EPFO)कडून लवकरच आपल्या 7 करोड पीएफ धारकांच्या अकाऊंटमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षाचे व्याज जमा केले जाणार आहे. त्यामुळे पीएफ धारकांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. पण EPFO कडून PF च्या संदर्भात एक बदल करण्यात आला आहे.

EPFO कडून आता पीएफ धारकांना आपले ई-नॉमिनेशन(EPFO e-nomination) करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे पीएफ धारकांच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळणार आहे. ई-नॉमिनेशन न केल्यास धारकांना आपल्या पीएफचा बॅलेन्स चेक करता येणार नसल्याचे, तसेच कुटुंबीयांना मिळणारा लाभही मिळणे अवघड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)

कुटुंबीयांच्या फायद्यासाठी

ई-नॉमिनेशनद्वारे पीएफ धारकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नॉमिनी म्हणून माहिती द्यावी लागणार आहे. यामुळे पीएफ धारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना पीएफ, पेंशन(EPS) आणि इन्श्योरन्स(EDLI) मधील रक्कम मिळणे सोपे होणार आहे. ही रक्कम नॉमिनी ऑनलाईन क्लेम करू शकते. त्यामुळे पीएफ धारकांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी ही सुविधा सूरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

असे करा ई-नॉमिनेशन

  • ई-नॉमिनेशन करण्यासाठी EPFO ची ऑफिशियल वेबसाईट https://www.epfindia.gov.in/ ला व्हिझिट करा
  • त्यानंतर Services सेक्शनमध्ये For Employees ऑप्शन सिलेक्ट करा
  • त्यानंतर आपला UAN no. आणि password टाकून लॉग इन करा
  • Manage Tab सिलेक्ट करुन e-Nomination वर क्लिक करा, Provide Details टॅबवर क्लिक करुन, सेव्ह बटन दाबा
  • Family Declaration साठी Yes वर क्लिक करुन Add Family Details वर क्लिक करा
  • नाॅमिनीचा फोटो, आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल आणि बँक अकाऊंटची माहिती यात द्यावी लागेल
  • इथे Nominee Details अ‍ॅड करुन Save EPF Nomination वर क्लिक करा
  • त्यानंतर ओटीपी जनरेशनसाठी E-sign ऑप्शन निवडा आणि आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर एंटर करा
  • हे केल्यानंतर आपले e-nomination EPFO वर रजिस्टर होईल

(हेही वाचाः EPFO: आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून अकाऊंटवर येणार PF चे व्याज)

पीएफ खातेधारक एकापेक्षा अधिक जणांना देखील नॉमिनी करू शकतात. यासाठी कोणाला किती रक्कम द्यायची याची माहिती नॉमिनेशन डिटेल्समध्ये द्यावी लागेल. आपल्या कुटुंबीयांचेच नाव नॉमिनीसाठी देता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.