भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO कडून नोकरदार वर्गाच्या भविष्याची तरतूद म्हणून निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात येते. पण असंघटित क्षेत्रातील रोजंदार मजूरांसाठी अशाप्रकारची कोणतीही तरतूद आतापर्यंत करण्यात आलेली नाही. पण आता EPFO कडून यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असंघटित क्षेत्रातील मजूर आणि छोटी-मोठी कामे करणा-या रोजंदारांचा ईपीएफओच्या प्रस्तावित पेन्शन योजनेत समावेश केला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
काय आहे योजना?
ही योजना वैयक्तिक योगदानावर आधारित असून यामुळे प्रत्येक कर्मचा-याला 60 वर्षे वयानंतर दरमहा कमीत कमी 3 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. युनिव्हर्सल पेन्शन स्कीम असे या योजनेला नाव देण्यात येऊ शकते. या नवीन योजनेत सेवानिवृत्ती पेन्शन,विधवा पेन्शन,मुलांचे पेन्शन आणि अपंगत्व पेन्शनची तरतूद असेल. पण या सेवेचा लाभ घेणा-यांसाठी किमान सेवेचा कालावधी मात्र 10 वर्षांवरुन 15 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तसेच जर का एखाद्या कर्मचा-याचा वयाच्या 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर या पेन्शन योजनंतर्गत त्यांच्या कुटुंबाला पेन्शन देण्यात येईल.
या योजनेंतर्गत दरमहा 3 हजार रुपये प्नेशनचा लाभ मिळवण्यासाठी एकूण 5.4 लाख रुपये रक्कम जमा करावी लागेल. ईपीएफओची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने स्थापन केलेल्या समितीने याबाबतची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community