EPFO Rule Change : आता पीएफचे पैसे रद्द झालेल्या चेक शिवाय मिळणार

EPFO Rule Change : बँक खातं बदलण्याची प्रक्रियाही सोपी केली आहे.

92
EPFO Rule Change : आता पीएफचे पैसे रद्द झालेल्या चेक शिवाय मिळणार
  • ऋजुता लुकतुके

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने पीएफ खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल केला आहे. पीएफ खात्यातून काही विशिष्ट कारणांसाठी मुदतीआधी पैसे काढण्याची सोय ईपीएफओ कार्यालयाने अलीकडेच करून दिली आहे. घर खरेदी, लग्न, आजारपण किंवा मुलांचं शिक्षण अशा महत्त्वाच्या कारणांसाठी तुम्ही ईपीएफओ खात्यातून ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मुदती आधी काढून गेऊ शकता. (EPFO Rule Change)

हे पैसे काढण्याची प्रक्रियाही ईपीएफओ कार्यालयाने आता सोपी केली आहे. त्यासाठी यूएएन पोर्टलवरुन ऑनलाईन क्लेम करावा लागतो. क्लेम सादर करताना म्हणजेच फॉर्म नंबर ३१ भरताना यापूर्वी बँक खात्याचा तपशील, खातेदाराचं नाव असणारा चेकचा फोटो अपलोड करावा लागत असे. मात्र, ईपीएफओनं या संदर्भातील नियम बदलला असून क्लेम सादर करताना चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही. कॅन्सल्ड किंवा रद्द केलेला चेक पूर्वी अपलोड करावा लागत होता. ती अट आता काढून घेण्यात आली आहे. बँक खात्याची माहितीही आता द्यावी लागणार नाही. याशिवाय ज्या कंपनीत नोकरी करता तिथून वेरिफिकेशनची गरज लागणार नाही. (EPFO Rule Change)

(हेही वाचा – World Health Day निमित्त ‘आरोग्यम धनसंपदा’ उपक्रमांतर्गत सावरकर स्मारकात रक्त तपासणी शिबीर संपन्न; २०० जणांनी घेतला लाभ)

ईपीएफओकडून दोन्ही प्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. आता बँक खातं पहिल्यांपासून यूएएन खात्याशी लिंक असतो आणि वेरिफाय केलेला असतो. यामुळे अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागत नाही यामुळं क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी होते. खराब किंवा अस्पष्ट अपलोड केलेल्या फाईलमुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी घटतील. ही सूट यापूर्वी काही केवायसी वेरिफाय असलेल्या सदस्यांसाठी लागू होती. ही सुविधा २८ मे २०२४ ला सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत याचा फायदा १.७ कोटी सदस्यांना झाला आहे. आता ही सुविधा सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. (EPFO Rule Change)

ईपीएफओचे ७.७४ कोटी सक्रीय दस्य आहेत. ज्यामध्ये ४.८३ कोटी सदस्यांनी आपली बँक खाती यूएएन क्रमांकाशी लिंक केलेली आहेत. तर, १४.९५ लाख सदस्यांची बँक खाती सध्या एम्पलॉयर जवळ प्रलंबित आहेत. आता एम्पलॉयरच्या मंजुरीची आवश्यकता नाही. त्यामुळे या सदस्यांना दिलासा मिळेल आणि क्लेमची प्रक्रिया वेगवान होईल. ज्या सदस्यांना यूएएन क्रमांकासोबत जोडलेले बँक खातं बदलायचं असल्यास आणि नवा बँक खाते क्रमांक जोडायचा असल्यास ही प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे. नवा बँक खाते क्रमांक, आयएफसी क्रमांक आणि ओटीपी नोंदवून वेरिफाय करा. यामुळं पीएफ क्लेम मंजूर होण्याची प्रक्रिया वेगवान होईल. (EPFO Rule Change)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.