10 वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळते पेन्शन, फक्त ‘हे’ काम करा! काय सांगतो EPFO चा नियम

100

खाजगी क्षेत्रात नोकरी करणा-या कर्मचा-यांना 10 वर्ष सेवा केल्यानंतर पेन्शनचा लाभ मिळतो, असा EPFO चा नियम आहे. मात्र यासाठी कर्मचा-यांना एक अट पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या पगारातून दरमहा मोठा हिस्सा पीएफ म्हणून कापला जातो. कर्मचा-यांच्या मूळ पगाराचा + डीएचा 12 टक्के हिस्सा दरमहा पीएफ खात्यात जमा केला जातो. त्यामुळे EPFO च्या नियमांनुसार, 10 वर्षे काम करणा-या कर्मचा-यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. पण त्यासाठी नोकरीची 10 वर्षे पूर्ण करणे गरजेचे असते.

ही अट पूर्ण करणे गरजेचे

जर कर्मचा-याने दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये मिळून 10 वर्षे काम केले असेल तरीही त्या कर्मचा-याला पेन्शनचा लाभ मिळू शकतो. फक्त अशावेळी कर्मचा-याने आपला UAN No. न बदलता जुनाच UAN No. चालू ठेवावा. जर एकच UAN No. असेल तर पेन्शनचा लाभ सहज घेता येतो. त्यामुळे आपला UAN No. लक्षात ठेवणे आणि आपल्या पीएफ अकाऊंटवरचा बॅलेन्स वारंवार चेक तपासणे हे गरजेचे आहे.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांनो, चुकूनही करू नका ‘या’ चूका, नाहीतर होईल मोठे नुकसान)

तसेच दोन नोक-यांच्या मध्ये अंतर जरी असले तरीही ते अंतर काढून टाकले जाते. मात्र नवीन नोकरीमध्येही कर्मचा-याला UAN No. आधीचाच ठेवणं गरजेचं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.