EPFO: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, पीएफवरील व्याज वाढवण्यावर होणार निर्णय

पीएफ मिळणा-या सर्व कर्मचा-यांना लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(EPFO)कडून आता पीएफच्या रक्कमेवरील व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

बैठकीत होऊ शकतो निर्णय

EPFO बोर्डाकडून स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येऊ शकतो. ज्यामुळे पीएफ खातेधारकांना जास्त परतावा देण्यास मदत होऊ शकेल. शेअर बाजारात ईपीएफओ कडून करण्यात येणारी गुंतवणूक 15 टक्क्यांवरुन 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. 29 आणि 30 जुलै रोजी होणा-या ईपीएफओच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.

(हेही वाचाः EPFO: PF मधून पैसे काढण्याच्या नियमांत मोठा बदल, आता होणार दुप्पट फायदा)

मंत्र्यांनी केली होती शिफारस

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबतची माहिती दिली होती. सीबीटीची उपसमिती असलेल्या एफआयएसीने इक्विटी आणि इक्विटी संबंधित गुंतवणूक मर्यादा 5 ते 15 टक्क्यांवरुन 5 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस त्यांनी केली होती.

पीएफ खातेधारकांकडून नाराजी

2021-22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने पीएफवरील व्याजदरात गेल्या 43 वर्षांतील सर्वात मोठी कपात केली होती. ईपीएफओच्या रक्कमेवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरुन 8.1 टक्के करण्यात आला होता. त्यामुळे पीएफ खातेधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांनो, चुकूनही करू नका ‘या’ चूका, नाहीतर होईल मोठे नुकसान)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here