ऑगस्ट महिन्यात थांबलेला पाऊस सप्टेंबरमध्ये सुरू आला आणि साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं. (Epidemics Increased) डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 10 दिवसांत डेंग्यूचे 350, मलेरियाचे 390, तर गॅस्ट्रोचे 192 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
(हेही वाचा – I.N.D.I.A. Meeting : I.N.D.I.A. आघाडीच्या जागावाटपाविषयी ठरणार ?; शरद पवारांच्या निवासस्थानी आज समन्वय समितीची पहिली बैठक)
पावसामुळे पावसाचे पाणी सर्वत्र साचून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, काविळ असे आजार होतात, तर किटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. (Epidemics Increased)
पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर, घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.
पालिकेने घेतलेली काळजी ?
- मलेरिया पसरवण्यास कारणीभूत ठरणारा अॅनोफिलीस डास आणि डेंग्यू फैलावणाऱ्या एडिस डासाच्या प्रतिबंधासाठी पालिकेच्या किटकनाशक विभागाकडून धूर फवारणी करून पावसाळी आजार पसरवणाऱ्या किटकांना आळा घालण्यात येतो.
- प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयात सुमारे साडेतीन हजार बेड पावसाळी आजारांसाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. घरोघरी तपासणी मोहिम आणि पालिका रुग्णालयांत मोफत उपचार देण्यात येत आहेत. (Epidemics Increased)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community