राज्यात ‘या’ भागात दीड लाख लाभार्थी रेशनपासून वंचित!

117

रेशन वितरणाच्या ई पॉस मशीन संदर्भात सर्व्हरची समस्या निर्माण झाली असून नाशिक जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून रेशन वितरण ठप्प झाले आहे. अन्न व नागरी ग्राहक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, असे साकडे भुजबळांकडे निवेदनाद्वारे रास्त भाव रेशन दुकानदार संघटनेने केले आहे.

दीड लाख लाभार्थी वंचित

रेशन वितरणातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बायोमेट्रिक पध्दतीने रेशन वितरण केले जाते. मात्र, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा रेशन वितरणात अडथळे निर्माण होतात. मागील पाच दिवसांपासून ई पॉस मशीन सर्व्हर नसल्याने तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचे समोर येत आहे. नाशिक शहरात २३० हून अधिक दुकाने असून दीड लाखांच्या आसपास लाभार्थी आहे. जिल्ह्याचा आकडा त्याहून अधिक आहे. हे लाभार्थी रेशनचे धान्य घेण्यासाठी दुकानांबाहेर कामधंदे सोडून तासनतास रांगा लावत आहेत. पण सर्व्हरच नसल्याने धान्य वाटप खोळंबले आहे. वेळेवर धान्य उपलब्ध होत नसल्याने गोरगरिबांची परवड होत आहे.

( हेही वाचा : ‘बेस्ट’चा महत्वपूर्ण निर्णय! मुंबईकर करणार प्रदूषणमुक्त प्रवास )

रेशन वितरण सुरळीत करा 

याबाबत रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन दिले असून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. सर्व्हरची समस्या सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावरुन प्रयत्न व्हावे व ही समस्या दूर करुन रेशन वितरण प्रणाली सुरळित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.