ऋजुता लुकतुके
नवीन वर्षांत ईपीएफओ (EPFO) कार्यालयाने सेंट्रलाईज्ड पेन्शन पेमेन्ट सिस्टिम (Centralized Pension Payment System) सुरू केली आहे. याचा फायदा निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. आणि एम्पॉईज पेन्शन स्कीम (Employees Pension Scheme) म्हणजेच कर्मचारी भविष्यनिर्वाह योजनेत त्यामुळे मूलगामी बदल होणार आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातच या बदलाची माहिती ईपीएफओने दिली होती. पण, नवीन वर्षी तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही एक सुटसुटीत आणि सोपी प्रणाली असून ती ताबडतोब कुठल्याही प्रक्रियेशिवाय सुरू होणार आहे. (EPS Rule Tweak)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन)
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवृत्तीवेतनधारकांना आता कचेरीच्या पायऱ्या घासाव्या लागणार नाहीत. त्यांना पेन्शनची (Pension) रक्कम अगदी बँक खात्यात किंवा एटीएम केंद्रावरही मिळू शकेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पेन्शन हस्तांतरणाचं काम आता ऑनलाईन होईल. सीपीपीएसचे इतरही फायदे पाहूयात, आतापर्यंत निवृत्तीवेतनधारक व्यक्तीने राहण्याची जागा बदलली तर त्यांना पेन्शन ऑर्डरही एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात किंवा बँकेच्या खात्यात द्याव्या लागत होत्या. आता तसं करावं लागणार नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन होईल. ईपीएफओ कार्यालय आता विभागीय स्तरावर नाही तर देशपातळीवर काम करतील. त्यामुळे तुमचा डेटा आता इथून तिथे हलवणं सोपं जाईल.
(हेही वाचा – Mumbai Goa Highway: जानेवारीच्या ‘या’ तारखेपासून पूर्ण क्षमतेने चालू होणार कशेडी बोगदा)
देशात कुठेही, कुठल्याही बँकेत किंवा बँकेच्या शाखेत किंवा एटीएम केंद्रांवर आता पेन्शनधारकाला पेन्शन मिळू शकेल. १९९५ मध्ये ईपीएफओ कार्यालयाने ईपीएस म्हणजेच कर्मचारी भविष्यनिर्वाह योजना सुरू केली. या अंतर्गत तुमच्या मासिक उत्पन्नातील जे १२ टक्के ईपीएफमध्ये जातात त्यातील ८.३३ टक्के रक्कम ही ईपीएस योजनेत जाते. आणि उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जाते. आणि ईपीएस योजनेतून पेन्शनधारकाला जन्मभर पेन्शन मिळण्याची सोय आहे. सर्व प्रकारचे भत्ते मिळून मासिक १५,००० रुपये इतकंच उत्पन्न असलेल्या व्यक्ती ईपीएससाठी पात्र आहेत. ईपीएसचे पैसे कंपनीकडून भरले जातात.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community