Statue of Chhatrapati Shivaji Maharaj: आसाममध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

343
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj: आसाममध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj: आसाममध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) आसाममधील जोराहाट येथे २९ मार्चला उभारण्यात येणार आहे. २१ पॅरा स्पेशल फोर्स, २१ वाघनखं परिवार आणि ऑल इंडिया एक्स सर्व्हिसमन वेल्फेअर असोसिएशनच्या पुढाकाराने हा पुतळा उभारण्यात येत आहे.

हा पुतळा नऱ्हे येथील शिल्पकार विवेक खटावकर यांनी अवघ्या २ महिन्यांत साकारला आहे.’२१ वाघनखं परिवार’च्या सर्व कमांडोज आणि परिवाराने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे. नुकतेच खटावकर यांच्या स्टुडियोत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नुकतेच पूजन करण्यात आले. या वेळी शिशिर महाजन, ब्रिगेडियर गोविंद इलंगोवन, ब्रिगेडियर पी. टी. घोगले, कर्नल एस. राजगोपाल, कॅप्टन स्वामिनाथन, मेजर बी. धामणकर, कर्नल एच. डी. खांडगे, कर्नल संभाजी पाटील, कर्नल राजगोपालन आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘…तरंच रिषभ पंत टी-२० विश्वचषक संघात खेळू शकतो’ )

पुतळ्याचे वैशिष्ट्य… 

या अश्वारूढ पुतळ्याबाबत खटावकर म्हणाले की, ‘जोराहाट येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इपॉक्सी आणि पॉलिस्टर रेझिनमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यांचे वजन २५० किलो असून, त्यामध्ये मजबुतीसाठी ‘एमएस’चा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्यावर अफजल वधाचे ४ फुटांचे शिल्प ४ बाय ४ फुटांची राजमुद्रा आणि ३ बाय २ फूट आकाराचे वाघनखाचे शिल्प बसवण्यात आले आहे. ‘

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.