विधीमंडळाच्या परिसरात आपल्या महान कार्याने इतिहासात अजरामर झालेल्या महिलांच्या प्रतीमा उभारण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण (Sreejaya Chavan) यांनी विधानसभेत केली.
(हेही वाचा – एटीएस ते गुन्हे पोलीस निरीक्षक… आव्हानात्मक क्षेत्रात तडफदार कामगिरी बजावणाऱ्या PI Deepali Kulkarni)
महिला दिनाची पूर्वसंध्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमिवर विधानसभेत बोलताना आ. श्रीजया चव्हाण (Sreejaya Chavan) म्हणाल्या की, महिला म्हणून जन्म मिळाल्याचा आम्हाला गर्व आहे आणि त्याचा आनंद आम्ही नेहमीच साजरा करतो. विधानभवन परिसर आणि सभागृहात अनेक महापुरुषांच्या प्रतीमा आहेत.
(हेही वाचा – NCW ने घेतला विवाहपूर्व समुपदेशनासाठी पुढाकार; नऊ राज्यांमध्ये 22 ठिकाणी उघडली “तेरे मेरे सपने” केंद्रे!)
त्याचप्रमाणे इतिहासात अजरामर झालेल्या राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सारख्या महान व प्रेरणादायी महिलांच्या प्रतीमा विधीमंडळ परिसर तसेच विधानसभेच्या सभागृहात लावण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (Sreejaya Chavan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community