Veer Savarkar यांचे आत्मार्पण दिन ते जयंतीपर्यंत महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अंदमानात असताना कैद्यांमध्ये देशभक्ती निर्माण केली. त्याचप्रमाणे आताच्या कारागृहातील कैद्यांचे विचार परिवर्तन व्हावे आणि कारागृहात बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रकार्य करावे, असा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागील आहे, असे नयना शिंदे म्हणाल्या.

46

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या आत्मार्पण दिनापासून त्यांच्या जयंतीपर्यंत (२६ फेब्रुवारी ते २८ मे) राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये हा उपक्रम राबवत आहे.

सध्या नाशिक रोड, सोलापूर, अलिबाग, अमरावती, नागपूर, जळगाव, बीड आणि मुंबई या कारागृहांमध्ये हा उपक्रम सुरू झाला असून लवकरच राज्यभरातील इतर कारागृहांमध्येही राबवला जाईल, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनेक महिला व पुरुष बंदिवान सहभागी झाले आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा यासंबंधी आपले विचार व्यक्त केले. त्यांचे लेखन केवळ प्रेरणादायी नसून, समाजात परतल्यानंतर राष्ट्रसेवेसाठी योगदान देण्याचा निर्धार दर्शवणारे आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळेच टिकलं आहे हिंदूंचं अस्तित्व!)

संस्थेच्या संचालिका नयना शिंदे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे बंदिवानांना सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आणि ते समाजात पुनर्वसनासाठी अधिक सक्षम होतात. सावरकरांच्या (Veer Savarkar) विचारांची प्रेरणा त्यांच्यासाठी नवी दिशा देणारी ठरत आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने कारागृहातील कैद्यांना वीर सावरकर (Veer Savarkar) यांनी लिहिलेली पुस्तके दिली जातात आणि त्यानंतर त्यांना त्याअनुसरून विषयी दिले जातात. या स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक दिले जाते आणि सहभागी सर्व कैद्यांना प्रमाणपत्र दिले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी अंदमानात असताना कैद्यांमध्ये देशभक्ती निर्माण केली. त्याचप्रमाणे आताच्या कारागृहातील कैद्यांचे विचार परिवर्तन व्हावे आणि कारागृहात बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रकार्य करावे, असा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागील आहे, असे नयना शिंदे म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.