
-
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वाढत्या रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करून रानटी हत्तींचा उपद्रव तातडीने रोखण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी वन विभागाला दिले.
या बैठकीचे आयोजन माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार करण्यात आले होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास, उपसचिव विवेक होसिंग, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बी. व्ही. रामाराव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Nanded Accident : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य; मुख्यमंत्र्यांकडून संवेदना व्यक्त)
बैठकीत बोलताना मंत्री नाईक (Ganesh Naik) म्हणाले, “दोडामार्ग परिसरातील रानटी हत्ती शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून वन विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा.” त्यांनी यासाठी तिलारी धरणाच्या परिसरातील संरक्षित क्षेत्रात या हत्तींना हलवण्याचा आराखडा तयार करण्याचेही आदेश दिले.
तिलारी प्रकल्पाच्या परिसरात हत्तींना त्यांच्या उपजिविकेसाठी आवश्यक असलेले बांबू, केळी, फणस इत्यादी वनस्पती लागवडीसाठी नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, हत्तींचा वावर असलेल्या भागात रेल्वे रुळांप्रमाणे फेन्सिंग करण्यावरही भर देण्यात आला. हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी त्यांना रेडिओ कॉलर लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या कामासाठी कर्नाटक व पश्चिम बंगालच्या वन विभागातील तज्ज्ञ मनुष्यबळाचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला.
(हेही वाचा – Hindu Village : मध्य प्रदेशात बनणार देशातील पहिले ‘हिंदू गाव’; बागेश्वर धाम म्हणाले, हा हिंदू राष्ट्राचा पाया)
याशिवाय, वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठी देण्यात येणाऱ्या भरपाईत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. विशेषतः, नुकसानभरपाई योजनेत बांबू पिकाचाही समावेश करण्याच्या प्रस्तावाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले. या बैठकीत आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांवर उद्भवलेल्या संकटाची माहिती दिली आणि या समस्येवर तातडीने उपाय योजण्याची मागणी केली. या निर्णयामुळे दोडामार्ग परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, वनविभागाच्या पुढील कृतीवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. (Ganesh Naik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community